Pune Wagholi Drunk and drive Accident : वाघोली येथील केसनंद फाट्याजवळ एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्याकडून येणाऱ्या भरघाव बिल्टवेस् इंटरप्राईजेस कंपनीच्या डंपरने फूटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले. या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला. ( Accident ) यामध्ये मुलांच्या काकांसह दोन बालकांचा समावेश आहे. तर सहाजण गंभीर जखमी झाले. जखमीमधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना रात्री 12 ते 1 वाजताच्या सुमारास वाघोलीतील केसनंद फाट्यावर पोलीस ठाण्याच्या समोरच ही घडली. डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत होता, अशी माहिती समोर आली आहे.
ब्राझीलमध्ये भीषण अपघात! बस अन् ट्रकच्या धडकेत ३८ ठार; टायर फुटून घडला अपघात
नेमकं काय घडलं?
केसनंद फाट्यावर फूटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना डंपरने चिरडल्याची घटना घडली आहे. फूटपाथवर एकूण 12 जण झोपले होते. तर बाकी फूटपाथच्या बाजूला झोपड्यात झोपले होते.भरघाव डंपर सरळ फूटपाथवर चढून झोपलेल्यांच्या अंगावर गेला. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर, सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
तिघांची प्रकृती चिंताजनक
जखमीमधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास पुण्यातील वाघोलीतील केसनंद फाटा येथे घडली. डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. वैभवी रितेश पवार ( वय 1 वर्ष ), वैभव रितेश पवार (वय 2 वर्ष), रीनेश नितेश पवार (वय 3) वर्षे अशी मृत्युमुखी झालेल्यांची नावे तर इतर सहाजण जखमी आहेत.
मृत झालेल्यांची नावं
1. विशाल विनोद पवार वय 22 वर्ष, रा. अमरावती मूळ जिल्हा
2. वैभवी रितेश पवार वय 1 वर्ष
3. वैभव रितेश पवार वय 2 वर्ष
जखमी झालेल्यांची नावं
1. जानकी दिनेश पवार, 21 वर्षे
2. रिनिशा विनोद पवार 18
3. रोशन शशादू भोसले, 9 वर्षे
4. नगेश निवृत्ती पवार, वय 27 वर्षे
5. दर्शन संजय वैराळ, वय 18
6. आलिशा विनोद पवार, वय 47 वर्षे
आरोपी डंपर चालकाला अटक
डंपर चालक क्रमांक (MH 12 VF 0437) याने दारू पिलेल्या अवस्थेत फुटपाथवर झोपलेल्या लोकांवर डंपर चढवला आहे. आरोपी डंपर चालक गजानन शंकर तोट्रे, 26 वर्षे रा. नांदेड यास ताब्यात घेतला आहे. आरोपीविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला असून वैद्यकीय चाचणी करून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास वपोनी पंडित रेजितवाड करत आहेत.