Download App

मला अटक करणं हा एक कट होता, डीएस कुलकर्णींचा गंभीर आरोप

  • Written By: Last Updated:

D.S.kulkarni : घराला घरपण देणारी माणसं या घोषवाक्याने आपल्या व्यावसायाची सुरूवात करणारे डी. एस. कुलकर्णी हे एक नामांकित बिल्डर्स आहेत. त्यांची डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड या नावाने पुण्यात कंपनी आहे. ही कंपनी काही पुण्यातीलचं चार बांधकाम व्यावसायिकांनी विकत घेतली आहे. दरम्यान, एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही कंपनी कवडीमोल किंमतीने घेतली असून, (D.S.kulkarni ) हे लोक ठेवीदारांचे पैसे परत करण्यास तयार नाहीत असा गंभीर आरोप डी.एस.कुलकर्णी यांनी केला आहे.

 

अवघ्या 826 कोटी रुपयांना घेतली

यावेळी बोलताना आपल्या मालमत्तेविषयी डी.एस.कुलकर्णी बोलले आहेत. ते म्हणाले, 16 हजार कोटींची माझी ही मालमत्ता आहे. मात्र, ती अवघ्या 826 कोटी रुपयांना विकत घेतली असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. यावेळी त्यांनी कुणी ही मालमत्ता विकत घेतली त्यांची नावही सांगितली आहेत. त्यामध्ये व्ही.टी. पारलेशा, जयंत शहा, अशोक चोरडीया आणि प्रमोद रांका अशी ही नावं आहेत. यांनीच NCLT मार्फत डीएसके यांच्या मालमत्ता विकत घेतल्याचंही डी.एस.कुलकर्णी यांनी सांगितलं.

 

मालमत्ता विकण्यास स्थिगिती

डी.एस. कुलकर्णी यांनी आपल्या मालमत्ता यांनी कवडीमोल भावात हडपल्याचा आरोप केला आहे. तसंच, याबाबत ते कोर्टातही गेले आहेत. डी.एस कुलकर्णी म्हणाले, या व्यवसायिकांनी NCLT मार्फत डीएसके मालमत्ता विकत घेतल्या आहेत. त्याविरोधात आपण कोर्टात गेलो आहोत. त्यावर सुप्रीम कोर्टानं 10 मेपर्यंत या मालमत्ता विकण्यास स्थिगिती दिली असल्याची माहिती डीएसकेंनी दिली आहे.

 

माझ्याकडं काहीच नाही

सध्या अंगावरील कपडे सोडले तर माझ्याकडं म्हणावं असं काहीच नाही असं मत डीएसकेंनी व्यक्त केलं. माझ्या मालमत्ता तसंच, बँक खाती गोठवली आहेत. मी ठेवीदारांचे पैसे परत कसे देऊ असा प्रश्न माझ्यासमोर आहे अशी हतबलताही त्यांनी यावेळी बोलून दाखवली. दरम्यान, 2017 मध्ये एकाच वेळी मला 32 हजार जणांनी पैसे मागितल्याचं कुलकर्णी म्हणाले. मी आयुष्यात कधीही खोट बोललो नाही असं म्हणत माझ्या जमिनी हडप केल्याचा आरोप जीएसकेंनी केला आहे.

 

गुंतवणुकदारांचे पैसे परत करायचे आहेत

मला सर्व गुंतवणुकदारांचे पैसे परत द्यायचे आहेत. मी दिवाळखोर नाही. असंही डीएसके म्हणाले आहेत. मला आणखी एक महिन्याचा कालावधी दिला असता, तर सर्व मुद्दे निकाली लागले असते अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसंच,मी पैसे देत होतो असा दावाही डीएसके यांनी केला आहे. मला द्यायला थोडेचे पैसे कमी पडत होते. परंतु, मला अटक होण्याआधी सर्व बँक खाती गोठवण्यात आली होती. हे माझ्याविरोधात सर्व ठरवून केल्याचा थेट आरोपच कुलकर्णी यांनी केला आहे.

follow us