मोठी बातमी : पुण्यात डी.एस. कुलकर्णी यांच्या कार्यालयावर ED ची छापेमारी; पाहा व्हिडिओ
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी.एस. कुलकर्णी (D.S.Kulkarni) यांच्या कार्यालयावर ईडीने छापेमारी केल्याचे वृत्त समोर आले आहे. जंगली महाराज रस्त्यावर असणाऱ्या कुलकर्णी यांच्या कार्यालयात ही कारवाई केली जात आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ईडीची दोन पथकांकडून ही छापेमारी सुरू असून, हे पथक मुंबईवरून पुण्यात आलं आहे. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके काही वर्षे पुण्यातील येरवडा कारागृहात कैद होते. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला होता. त्यानंतर आता ईडीकडून अशाप्रकारची छापेमारी केली जात आहे. (ED Raid On D.S. Kulkrani Office In Pune J.M.Road )
डी. एस. कुलकर्णी पाच वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर; गुंतवणूकदारांच्या ८०० कोटींचं काय?
घराला घरपण देणाऱ्या टॅग लाईनचे पोहोचले घराघरात
डी.एस. कुलकर्णी हे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांच्या ‘घराला घरपण देणाऱ्या’ जाहिरातीतील टॅग लाईननं त्यांनी सामान्या नागरिकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं होतं. त्यांनी पुण्यातील विविध भागात अनेक प्रोजेक्ट उभे केले आहेत. मात्र, गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर पुण्यातील अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांना या प्रकरणात अटकदेखील करण्यात आली होती. अनेक दिवस ते पुण्यातील येरवडा कारागृहात कैद होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर आज (दि.) पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील डीएस कुलकर्णी यांच्या कार्यालयावर ईडीने सकाळपासून छापेमारी सुरू केली आहे.
Mangaldas Bandal : ७३ व्या वर्षीही डीएसके जेलमध्ये समुपदेशन करतात
मालमत्तेचा लिलाव करण्याचे न्यायालयाचे आदेश
गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी उच्च न्यायालयाने जप्त केलेल्या मालमत्तांचा लिलाव करून लवकर निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. त्याशिवाय लिलावामधील योग्य मालमत्तेची यादी उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाने तीन आठवड्यात तयार करण्याचेही निर्देश दिले आहेत.
अनेक स्थावर मालमत्ता जप्त
आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान डीएसके यांच्या साधारण 195 स्थाव मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्वांचा लिलाव करून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. या सर्व मालमत्तांचा लिलाव करण्याची परवानगी द्यावी, यासाठी मावळ-मुळशीचे उपविभागीय दंडाधिकारी सुरेंद्र नवले यांनी येथील विशेष न्यायालयात केला होता. त्यावर लिलावामधील योग्य मालमत्तेची यादी उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाने तीन आठवड्यात तयार करण्याचेही निर्देश दिले आहेत.
पुण्यात डी.एस. कुलकर्णी यांच्या कार्यालयावर ED ची छापेमारी pic.twitter.com/6NOUtYYbAo
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) April 19, 2024
बातमी अपडेट होत आहे…