Mangaldas Bandal : ७३ व्या वर्षीही डीएसके जेलमध्ये समुपदेशन करतात…

Mangaldas Bandal : ७३ व्या वर्षीही डीएसके जेलमध्ये समुपदेशन करतात…

पुणे : येरवडा जेलमध्ये मी जेव्हा गेलो. तेव्हा तिथे माझी नियमितपणे माजी आमदार अनिल भोसले (Anil Bhosle) तसेच पुण्यातील बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी उर्फ डीएसके (Dipak Sakharam Kulkarni) यांची भेट व्हायची. डीएसके नेहमी म्हणायचे की अप्पा आपण फार चुकीच्या पद्धतीने जेलमध्ये आलो आहोत. पण तरीही हरकत नाही. कायदा आपले काम करत राहील, असे पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी उर्फ डीएसके हे सांगायचे. विशेष म्हणजे वयाच्या ७३ व्या वर्षीही ते जेलमध्ये इतर कैद्यांना चांगल्या प्रकारे समुपदेशन करत आहे. त्यामुळे अनेक कैद्यांमध्ये मी सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याचे पाहायले, असा अनुभव डीएसके यांच्याविषयी पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) यांनी सांगितला.

शिवाजीराव भोसले सहकारी बँक आर्थिक फसवणूक आणि खंडणीप्रकरणात अटक झाल्यानंतर तसेच तब्ब्ल १६ महिन्यानंतर जेलमधून बाहेर आल्यानंतर मंगलदास बांदल यांनी जेलमध्ये काय काय घडले ते सांगितले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अनिल भोसले आणि पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्याबाबत अनुभव सांगितले.

Mangaldas Bandal : अजित पवारांनी शब्द दिला… पण पाळलाच नाही!

मंगलदास बांदल म्हणाले की, डीएसके जेलमधील सर्वच कैद्यांना खूप चांगल्या पद्धतीने समुपदेशन करत आहेत. त्यामुळे जेलमध्ये राहूनही अनेकांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होत आहे. तर शिवाजीनगरचे माजी आमदार अनिल भोसले हयांच्याशी देखील नियमित बोलणे व्हायचे. पण त्यांच्या आजारपणामुळे आणि गोळ्या औषधामुळे फार बोलणे व्हायचे नाही.

मंगलदास बांदल म्हणाले की, प्रत्येकाच्या आयुष्यात वाईट काळ येत असतो. तेव्हा त्याच्या पाठीशी सगळ्यांनी उभे राहिले पाहिजे, असे मला वाटते. कारण आज कितीही नाही म्हटले तरी पुणे शहराच्या विकासात डीएसके यांचे योगदान नाकारता येणार नाही. त्यांच्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होत आल्याने डीएसके देखील लवकरच जेलमधून बाहेर येतील. पण मला एवढंच म्हणायचं आहे की प्रत्येक माणसांकडून काही ना काही चुका होत असतात. तेव्हा त्याच्या आधीच्या चांगल्या कामांचा विचार केला जात नाही. त्याचा विचार व्हावा एवढीच अपेक्षा आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube