Mangaldas Bandal : अजित पवारांनी शब्द दिला… पण पाळलाच नाही!
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar), जयंत पाटील (Jayant Patil) आणि दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी मला एक महत्वाची बैठक आहे तुम्ही या म्हणून बोलवलं होतं. तिथं त्यांनी मला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पद देतो म्हणून शब्द दिला होता. पण मी म्हटले मी काही पक्ष संघटनेत काम करणारा माणूस नाही. तुम्ही इतरांना पद द्या. त्यावेळी राजकीय परिस्थिती बदलत होती. मला त्यांनी तुझ्या पत्नीला जिल्हा परिषद अध्यक्षपद देतो म्हटले पण दिलेच नाही, असा आरोप पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) यांनी अजित पवार यांच्यावर केला.
शिवाजीराव भोसले सहकारी बँक आर्थिक फसवणूक आणि खंडणीप्रकरणात अटक झाल्यानंतर तसेच तब्ब्ल १६ महिन्यानंतर जेलमधून बाहेर आल्यानंतर मंगलदास बांदल यांनी जेलमध्ये काय काय घडले ते सांगितले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी शब्द देऊनही पाळला नसल्याचे सांगितले.
Mangaldas Bandal : अजित पवारांना चॅलेंज दिलं… अन् सभापती होऊन दाखवलं!
मंगलदास बांदल म्हणाले की, मी राष्ट्रवादी काँग्रेसकडे, शरद पवार, अजित पवार यांच्याकडे राजकीय मदत मागायला गेलो नाही. उलट त्यावेळी बाबा राक्षे, रामभाऊ दाभाडे, उमाजी सरक असे अपक्ष निवडून आलो. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची आमच्या भागात ताकद नव्हती. तेव्हा तर अजित पवार तर सुरुवातीला म्हणायचे यांना टायरमध्ये टाका आणि हाणा, जेलमध्ये टाका असे म्हणायचे. मात्र, तरीही आम्ही मोठ्या नेत्यांना मान देऊन मदत केली. तेव्हा काही राजकीय आश्वासन दिले होते. जर शिरूर लोकसभा निवडणुकीत आढळराव पाटील यांचा पराभव झाला तर माझ्या पत्नीला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देतो असे सांगितले. पण कार्यभाग साध्य झाल्यानंतर ते विसरून गेले.