Mangaldas Bandal : अजित पवारांना चॅलेंज दिलं… अन् सभापती होऊन दाखवलं!
पुणे : मी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांना एकदा म्हटलो होतो. माझ्याकडे चार लोकं जरी असले तरी मी मी बाजार समितीचा सभापती होऊन दाखवू का, त्यावर अजित पवार म्हटले होते, काय सांगतो. तुझ्यासारखे बोलबच्चन करणारे माझ्याकडे खूप आहेत. अजित पवार यांना मी तेव्हा चॅलेंज दिले आणि सभापती होऊन दाखवले. तेव्हा जाहिररित्या अनेकांनी मदत केली. त्याचे कारण तुमचा स्वभाव असतो. तुम्ही लोकांशी कसे बोलता आणि वागता, त्यावर लोकं तुमच्या जवळ येतात. कदाचित त्यावेळी अजित पवार यांना मी बोलबच्चन वाटल्याने ते तसे म्हटले असतील. पण मी केवळ बोलबच्चन नाही तर प्रत्यक्ष काम करणाऱ्या तळागळातील कार्यकर्ता असल्याने अजित पवार यांना चॅलेंज देऊन सभापती होऊन दाखवले, असे पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) यांनी सांगितले.
शिवाजीराव भोसले सहकारी बँक आर्थिक फसवणूक आणि खंडणीप्रकरणात अटक झाल्यानंतर तसेच तब्ब्ल १६ महिन्यानंतर जेलमधून बाहेर आल्यानंतर मंगलदास बांदल यांनी जेलमध्ये काय काय घडले ते सांगितले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना अजित पवार यांच्याबाबतचे किस्से सांगितले.
Ajit Pawar : शिंदे-फडणवीसाकडून फक्त सरकार टिकवण्यासाठी धडपड!
मंगलदास बांदल म्हणाले की, जेलमध्ये असतानाही मी वाचन, व्यायाम करायचो. तुरुंगातही मी कार्यकर्त्यांची कामं करण्याबरोबर समुपदेशन करायचो. जेलमधील १६ महिन्यात मी २००-३०० पुस्तके वाचन केले आहे. मी जे बोलतो ते करून दाखवतो. अनेकांना वाटतं मी बोलबच्चन आहे. पण माझा अभ्यास तेवढा आहे. मी सतत वाचत असतो. अगदी जेलमध्ये देखील मी ५-६ वर्तमान पत्र आणि पुस्तकं वाचत असे. त्यामुळे माझ्याकडे नवीन विचार आहे. त्यामुळे मी बोलतो आणि त्याप्रमाणे करतो. पण काहींना मी केवळ बोलबच्चन वाटतो. अगदी अजित पवार यांनाही मी तसाच वाटायचो. पण मी बाजार समिती निवडणुकीत मी अजित पवार यांना चॅलेंज देऊन निवडून आलो होतो.
बाजार समिती निवडणुकीवेळी अजित पवार यांनी मला खूप अडवण्याचा प्रयत्न केला. मतदान घटवण्यासाठी-वाढवण्यासाठी प्रयत्न केले. पण मला राधाकृष्ण विखे-पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांनी मला खूप मदत केल्याने मी बाजार समिती निवडणुकीत निवडून आलो, असे मंगलदास बांदल यावेळी म्हणाले.