‘जल्लोष 2026’ या विद्यापीठस्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

पुणे विद्यापीठाच्या जल्लोष 2026 सांस्कृतिक स्पर्धेत डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.

D Y Patil Engineering College Jallosh 2026

D Y Patil Engineering College Jallosh 2026

D Y Patil Engineering College Jallosh 2026: पिंपरी: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘जल्लोष 2026’ या विद्यापीठस्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शैक्षणिक अभ्यासासोबतच सांस्कृतिक क्षेत्रातील आपल्या कलागुणांची प्रभावी छाप उमटवत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

काँग्रेस खासदारावर 11 विद्यार्थिनींचे लैंगिक छळाचे आरोप; भाजप महिला आक्रमक, उद्या काँग्रेस कार्यालयाबाहेर मोर्चा!

या स्पर्धेसाठी महाविद्यालयातील एकूण 14 विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा प्रकारांमध्ये सहभाग नोंदवला होता. त्यापैकी पहिल्या फेरीत 9 विद्यार्थ्यांची पुढील फेरीसाठी निवड झाली. त्यानंतर संगमनेर येथे आयोजित दुसऱ्या फेरीतील स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

या स्पर्धेत पाश्चात्त्य संगीत प्रकारात अनन्या राय हिने प्रथम पारितोषिक, तर पोस्टर मेकिंग स्पर्धेत यश खुळे याने तृतीय पारितोषिक पटकावले. सुमारे 300 स्पर्धकांमधून आपल्या कलागुणांच्या आणि कौशल्याच्या जो0रावर या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश विशेष कौतुकास्पद आहे.

“हवा प्रदूषित आता पाणीही दूषित… पुणेकरांनी श्वास घ्यायचा कसा, प्यायचं काय?” नगरसेवक अमोल बालवडकरांचा सवाल

विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांना लाभलेले मार्गदर्शन आणि प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले. डॉ. रोहित वरवडकर, डॉ. आराधना चव्हाण आणि आरती उटीकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या उल्लेखनीय यशाबद्दल डीन ऑफ स्टुडंट्स अफेअर्स डॉ. स्मिता पाटसकर, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. पी. मालती आणि प्रशासकीय अधिष्ठाता डॉ. संदीप सरनोबत यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देणाऱ्या महाविद्यालयीन उपक्रमांचेही त्यांनी कौतुक केले.

गोपीचंद पडळकरांना मोठा धक्का; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज अवैध, कोल्हापूर खंडपीठाचा निर्णय

विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश महाविद्यालयासाठी अभिमानास्पद असून, त्यांच्या कलात्मक अभिव्यक्तीला, आत्मविश्वासाला आणि सांस्कृतिक सहभागाला नवी प्रेरणा देणारे आहे.

Exit mobile version