पुणे विद्यापीठात शिकल्यावर कुठंही राजकारण करता येतं, जेएनयूच्या कुलगुरूचं मोठं विधान

Santishree Dhulipudi Pandit On Savitribai Phule Pune University : वासुदेव बळवंत फडके स्मृती व्याख्यान मालेमधील एका वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली (Pune University) आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाही डावं असल्याचं वक्तव्य जेएनयूच्या कुलगूरू डॉ. शांतिश्री पंडित यांनी केलंय. सध्या हे विधान चांगलंच चर्चेत आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शांतीश्री पंडित म्हटलंय की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) नवी दिल्लीस्थित जेएनयूपेक्षा जास्त ‘डाव्या विचारसरणीचे’ आहे. ते नेहमीच तसं दिसत नसल्याचं देखील पंडित यांनी स्पष्ट केलंय.
‘फक्त मनभेद…’ सुरेश धस अन् धनंजय मुंडेंच्या भेटीवर चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा गौप्यस्फोट
डॉ. शांतीश्री पंडित (JNU Chancellor Dr Santishree Dhulipudi) म्हणाल्या की, जेएनयूमध्ये काम करणं सोपं (Pune University) नव्हतं. त्यासाठी धैर्याची आवश्यकता होती, परंतु पुणे विद्यापीठातील कार्यकाळामुळे सध्याच्या भूमिकेत कर्तव्य कार्यक्षमतेने पार पाडण्यास मदत झाली. केंद्राने तीन वर्षांपूर्वी त्यांची जेएनयूच्या कुलगुरूपदी नियुक्ती केली होती. पुण्यात आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके स्मृती व्याख्यानमालेत डॉ. शांतीश्री पंडित बोलत होत्या.
महाराष्ट्रातील कोण तेही विद्यापीठ धार्मिक श्रद्धेवर आधारित अभ्यासक्रम का देत नाही? यावर डॉ. शांतीश्री पंडित म्हणाल्या की, प्रत्यक्षात धार्मिक श्रद्धेवर आधारित कोणतेही अभ्यासक्रम नाहीत., परंतु जेएनयूमध्ये हिंदू अभ्यास केंद्र, बौद्ध अभ्यास केंद्र आणि जैन अभ्यास केंद्र आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे जेएनयूपेक्षा जास्त ‘डावे’ विचारसरणीचे आहे. 2022 मध्ये जेएनयूच्या कुलगुरूपदाची सूत्रे हाती घेण्यापूर्वी त्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात राज्यशास्त्राच्या प्राध्यापक होत्या. जेएनयूच्या कुलगुरू म्हणून काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.
बावनकुळेंची मध्यस्थी… धनंजय मुंडे अन् सुरेश धस यांच्यात समझौता? गुप्त भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
डॉ. शांतीश्री पंडित या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने गुरुवारी आयोजित केलेल्या वासुदेव बळवंत फडके स्मृती व्याख्यानमालेत पंडित ‘नवीन युगातील भारतीय समाज – संधी आणि आव्हाने’ या विषयावर व्याख्यान देत होत्या. पंडित म्हणाल्या की, जेव्हा लोक त्यांना विचारतात की, डाव्यांचा बालेकिल्ला मानली जाणारी जेएनयू सारखी शैक्षणिक संस्था इतक्या कार्यक्षमतेने कशी चालवता? तेव्हा त्या त्यांच्या एसपीपीयूमधील तिच्या कार्यकाळातील प्रशिक्षणाचा संदर्भ देताच.
जेएनयूच्या कुलगुरू डॉ. शांतिश्री पंडीत यांनी म्हटलंय की ‘मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये काम केलंय. तिथं शिकल्यावर कुठेही राजकारण करता येईल. त्याच जोरावरच मी जेएनयूमध्ये चांगलं काम करू शकले. जेएनयूमध्ये आजवर एकही स्त्री कुलगुरू झाली नव्हती. ही परंपरा संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बदलली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.