Love Jihad चा आरोप करत तरूणाला मारहाण; पुणे विद्यापीठातील धक्कादायक प्रकार

Love Jihad चा आरोप करत तरूणाला मारहाण; पुणे विद्यापीठातील धक्कादायक प्रकार

Hit youngster in Pune by accusation Love Jihad : पुण्यामध्ये ( Pune ) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे विद्यापीठामध्ये ( Savitribai Phule Pune University ) शिक्षण घेणाऱ्या एका तरूणाला लव्ह जिहादचा ( Love Jihad ) आरोप करत बेदम मारहाण करण्यात आली आहे. या तरूणाने या प्रकरणी पुण्यातील चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात आपली फिर्याद नोंदवली आहे. त्या अगोदर त्याने विद्यापीठाच्या वसतीगृह प्रमुखांकडे याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर आता पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.

नार्को टेस्ट केल्यास काँग्रेस नेतेही म्हणतील मोदीच पंतप्रधान होणार; मोदींसमोर मुनगंटीवारांचा जोरदार हल्ला

या फिर्यादीमध्ये या तरूणाने सांगितले आहे की, या मारहाण झालेल्या तरुणाचं नाव जुनेद बाबाण जमादार असं आहे. हा तरुण १९ वर्षांचा असून तो पुणे विद्यापीठातील स्कील डेव्हलपमेंट डिपार्टमेंटमध्ये शिक्षण घेत आहे. तसेच तो विद्यापीठाच्या मुलांच्या वस्तीतृहामध्ये राहत आहे. या दरम्यान रविवारी ( 7 एप्रिल) दुपारी दोन वाजेच्या सुमारास हा तरूण त्याच्या मित्र-मैत्रिणींना सोबत जेवण करून परतत असताना दोन मोटरसायकलवर आलेल्या सहा तरुणांनी त्याला आधार कार्ड मागितले.

‘नाथाभाऊ’ परतणार! दगडाखाली हात नेमके कोणाचे? भाजपचे की खडसेंचे?

त्यानंतर त्याच्यावर लव्ह जिहाद करत असल्याचा आरोप केला. त्याच्यासोबत असलेल्या मैत्रिणींना या तरुणांनी तिथून जायला सांगितले. त्यानंतर या तरुणाला शिवीगाळ करून मारण्याची धमकी देण्यात आली. त्याला मारहाण करण्यात आली. या तरुणाने हॉस्टेलवर परतल्यानंतर विद्यापीठाच्या सुरक्षारक्षक विभागात तक्रार केली. त्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांकडून या तरुणाला उपचार घेण्याचे सांगण्यात आले.

Sanjay Dutt: लोकसभा निवडणूक लढवणार की नाही ? संजय दत्त स्पष्टच म्हणाला…

या घटनेवर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर सुरेश गोसावी यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube