नार्को टेस्ट केल्यास काँग्रेस नेतेही म्हणतील मोदीच पंतप्रधान होणार; मुनगंटीवारांचा जोरदार हल्ला

नार्को टेस्ट केल्यास काँग्रेस नेतेही म्हणतील मोदीच पंतप्रधान होणार; मुनगंटीवारांचा जोरदार हल्ला

Sudhir Mungantiwar : लोकसभा निवडणुकीसाठी ( Lok Sabha elections ) महायुतीकडून आजपासून पूर्व विदर्भातील पहिल्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघात सभांचा धडाका सुरू झााला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi) यांची आज चंद्रपुरात सभा झाली. भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार ( Sudhir Mungantiwar ) यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली आहे. या सभेत बोलताना मुनगंटीवार यांनी विरोधकांवर विशेषतः कॉंग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, काँग्रेसच्या नेत्यांची देखील नार्को टेस्ट केल्यास ते देखील म्हणतात की, मोदीच पंतप्रधान होणार.

‘नाथाभाऊ’ परतणार! दगडाखाली हात नेमके कोणाचे? भाजपचे की खडसेंचे?

यावेळी मुनगंटीवार म्हणाले की, मी जनतेला विनंती करतो की, या लोकसभा मतदार संघामध्ये विकासाच्या गाडीला काँग्रेसचे पंक्चर चाक लावू नका. सर्व पक्षांचे नेते त्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांची देखील नार्को टेस्ट केल्यास ते देखील म्हणतात की, मोदीच पंतप्रधान होणार. काँग्रेसला मत म्हणजे विनाश, माफिया राज, गुंडा गर्दी, आपल्या पायावर धोंडा मारणे म्हणजे कॉंग्रेला मत आहे. काँग्रेसचे नेते म्हणतात की माझं डिपॉझिट जप्त करू मला त्यांची किव येते कारण माझं डिपॉझिट सामान्य माणसाच्या पैशातून भरण्यात आलं आहे. माझे पैसे दारू दुकानातून कमावलेले नाहीत. त्यामुळे माझ्या मतदारसंघात राहुल गांधी जरी आले. तरी माझं डिपॉझिट जप्त होणार नाही. खोटं बोलण्यासाठी काँग्रेसने नेत्यांना ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळेल.

Sanjay Dutt: लोकसभा निवडणूक लढवणार की नाही ? संजय दत्त स्पष्टच म्हणाला…

आमच्या मतदारसंघात करोडो रुपये खर्च करून प्रचार केला जात आहे. माझी मुलगी म्हणाली बाबा त्यांचे बोर्ड जास्त आहेत. मी म्हणालो आपले कार्यकर्ते जास्त आहेत. काँग्रेसकडून सोशल मीडियाचा जोरदार वापर केला जात असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांनी रेवंथ रेड्डींचा सोशल मीडिया चंद्रपूरमध्ये आणला आहे. मात्र हा सोशल मीडिया चंद्रपूरमध्ये आणण्यापेक्षा राहुल गांधींना अमेठीतून उभा करून सोशल मीडिया वापरा. त्यामुळे 19 एप्रिलला काँग्रेसच्या जनता काढल्याशिवाय राहणार नाही. असं म्हणत मोदींच्या उपस्थितीत मुनगंटीवारांनी कॉंग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना आशीर्वाद देण्यासाठी मोदींची चंद्रपुरात सभा झाली. मोरवा विमानतळाजवळील भव्य पटांगणात सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधानांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. तर यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील आज विदर्भात सभा घेणार आहेत. वर्धा लोकसभा मतदारसंघातील हिंगणघाट येथे भाजपचे उमेदवार व खासदार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ ते सभा घेत असल्याचे वृत्त आहे. सायंकाळी योगी आदित्यनाथ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी नागपुरात सभा घेणार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज