Download App

शिवाजीराव भोसले बॅंक फसवणूक प्रकरण; मंगलदास बांदल यांची मालमत्ता ईडीकडून जप्त

अजित पवार यांचे निकटवर्तीय मंगलदास बांदल यांना ईडीकडून मोठा धक्का बसलायं. बांदल यांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आलीयं.

Mangaldas Bandal ED Action : जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि अजितदादांचे निकटवर्तीय मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) यांना ईडीकडून मोठा धक्का बसलायं. शिवाजीराव भोसले बॅंकेच्या फसवणूक प्रकरणी बांदल यांची स्थावर मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आलीयं. बांदल यांच्यासह हनुमंत शंभाजी खेमधरे, सतीश यतीश जाधव यांचीही संपत्ती जप्त करण्यात आलीयं. यामध्ये एकूण 85 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आलीयं.

पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच्या फसवणूक प्रकरणी बांदल यांना 26 मे 2021 रोजी अटक करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांना जामीन मंजूर झाला होता. या काळात त्यांच्याविरोधात अनेक तक्रारी आल्याने आयकर विभागाकडूनही त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, CRPF करणार व्हीआयपींची सुरक्षा, एनएसजी कमांडोंची ‘सुट्टी’!

2021 मध्ये ईडीकडून मंगलदास बांद यांच्या घरी ईडीकडून छापा मारण्यात आला. या छाप्यादरम्यान ईडीच्या पथकाकडून त्यांची तब्बल 16 तास चौकशी केल्यानंतर ईडीच्या हाती घबाड लागलं होतं. त्यानंतर त्यांना अटक करुन मुंबईला नेण्यात आलं होतं.

follow us