मोठी बातमी ! पुण्यात नऊ ठिकाणी ईडीची छापेमारी.. मुश्रीफांच्या अडचणी वाढणार

पुणे : ईडीच्या (ED) पथकाने सकाळीच पुण्यातील 9 मोठ्या व्यावसायिकांच्या घरावर तसेच त्यांच्या कार्यालयांवर धाडी टाकल्या आहेत. या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. पुण्यात ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी सुरू केली असल्याने संबंधित ठिकाणी मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याशी या व्यावसायिकांचे कनेक्शन असल्याच्या संशयावरून […]

Untitled Design   2023 04 03T103530.011

Untitled Design 2023 04 03T103530.011

पुणे : ईडीच्या (ED) पथकाने सकाळीच पुण्यातील 9 मोठ्या व्यावसायिकांच्या घरावर तसेच त्यांच्या कार्यालयांवर धाडी टाकल्या आहेत. या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. पुण्यात ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी सुरू केली असल्याने संबंधित ठिकाणी मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याशी या व्यावसायिकांचे कनेक्शन असल्याच्या संशयावरून ही छापेमारी करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, ईडीच्या अधिकाऱ्यांनी पुण्यातील 9 व्यावसायिकांच्या घर आणि कार्यालयावर छापेमारी केली. या दरम्यान त्यांनी कागदपत्रांची तपासणी केली आहे. सिंहगड रोड आणि शिवाजी नगर परिसरात हे व्यावसायिक राहतात. तिथेच त्यांचे कार्यालयही आहे. या ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी सुरू केली.

यांच्या घरांवर छापेमारी
ईडीने पुण्यात छापा टाकलेल्या व्यावसायिकांमध्ये विवेक गव्हाणे, चंद्रकांत गायकवाड, जयेश दुधेडिया यांचा समावेश आहे. दरम्यान, काल पिंपरी-चिंचवडमध्ये ईडीने छापेमारी केली होती. सेवा विकास सहकारी बँकेच्या संचालकांनी कर्जांचे 124 बनावट प्रस्ताव मंजूर केले होते. या प्रकरणात जवळपास 430 कोटी रुपये विविध व्यक्ती व संस्थांना नियमबाह्य पद्धतीने वितरित केले होते. या प्रकरणी छापेमारी करण्यात आली होती.

आता ‘या’ ठिकाणी 7.0 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंपाचे धक्के

पोलिसांचा चोख बंदोबस्त
पुण्यात तब्बल नऊ ठिकाणी सकाळीच ईडीने छापेमारी सुरु केली आहे. ईडीने नऊ व्यावसायिकांच्या घरावर तसेच कार्यालयावर धाड टाकली आहे. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ज्या ठिकाणी छापेमारी करण्यात आली, तिथे सुरक्षा रक्षकांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कुणालाही आत सोडण्यात येत नाहीये. तसेच आतील लोकांना बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. याशिवाय या व्यावसायिकांच्या कुटुंबातील लोकांना कुणालाही फोन करण्यास मज्जाव करण्यात आलं आहे.

उद्धव ठाकरेंना धक्का… पुण्यातून ‘हा’ सैनिक भाजपच्या वाटेवर

धोक्याची घंटा
राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कथित साखर कारखाना घोटाळ्याप्रकरणी ही छापेमारी करण्यात आली आहे. मुश्रीफ यांच्याशी संबंधित जे व्यावसायिक आहेत, त्यांच्याच घर आणि कार्यालयावर छापेमारी करण्यात आली आहे. त्यामुळे मुश्रीफ यांच्यासाठी ही धोक्याची घंटा असल्याचं मानलं जात आहे.

Exit mobile version