उद्धव ठाकरेंना धक्का… पुण्यातून ‘हा’ सैनिक भाजपच्या वाटेवर

Untitled Design   2023 04 03T095157.572

पुणे : शिवसेनेतील बंडानंतर शिंदे गट व ठाकरे गट असे तयार झाले. त्यानंतर शिंदे यांनी ठाकरे यांना धक्कातंत्र देत अनेक महत्वाचे नेतेमंडळी आपल्या पक्षात घेतले. दरम्यान आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पुण्यातून एका मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या आणखी एका सैनिकाने उद्धव ठाकरे यांची साथ सोडत भाजपच्या दिशेने वाटचाल केली आहे. शिवसेनेचे माजी पुणे जिल्हा प्रमुख राम गावडे (Ram Gavde) यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ते येत्या 5 एप्रिलला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे ठाकरे यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे.

आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने प्रत्येक पक्षाकडून सभा, रॅली घेतल्या जात आहे. कार्यकर्त्यानाची एकजूट केली जात आहे. मात्र असे असतानाही काही नेतेमंडळी पक्षातून काढता पाय घेत दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहे. यातच सध्या उद्धव ठाकरे गटाला एकापाठोपाठ एक धक्के दिले जात आहे. पुणे जिल्ह्यातल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून ओळख असलेले शिवसेनेचे माजी पुणे जिल्हा प्रमुख राम गावडे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. ते आता भाजपच्या वाटेवर असून लवकरच ते आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश करतील अशी माहिती समोर येत आहे.

ऋषी सिंहने जिंकले इंडियन आयडॉल 13 चं विजेतेपद

कोण आहेत राम गावडे ? जाणून घ्या त्यांची राजकीय कारकीर्द
1991 पासून राम गावडे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. शिवसेनेत असताना त्यांनी अनेक महत्वाच्या पदे सांभाळली तसेच या पदांवर काम केली. तब्बल सहा वर्ष त्यांनी पुण्याच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी देखील योग्यरीत्या सांभाळली. धानोरे येथे त्यांनी शाखा प्रमुख म्हणून त्यांनी आपली राजकीय सुरुवात केली.

आता ‘या’ ठिकाणी 7.0 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंपाचे धक्के

म्हणून गावडे यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला
राम गावडे यांनी पुणे जिल्ह्यात शिवसेना वाढीसाठी मोठे प्रयत्न केले. त्यांना शिवसेनेकडून जिल्ह्याचे प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील शिवसैनिकांना विकासासाठी काहीच दिले नाही. सतत अवमानाची वागणूक तसेच वारंवार बैठका घेऊनही त्यावर काहीच अंमलाबजावणी झाली नाही. या विषयांना कंटाळून अखेर गावडे यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आपण पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे राम गावडे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

Tags

follow us