Download App

Video : ठाकरेंच्या विजयी मेळाव्यापूर्वी शिंदेंनी पेटवला नवा वाद; पुण्यात शाहंसमोर ‘जय गुजरात’ची घोषणा

Eknath Shinde : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हिंदी सक्तीवरुन राजकारण चांगलेच तापले असताना आता पुन्हा एकदा नवीन वाद निर्माण होण्याची

Eknath Shinde : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हिंदी सक्तीवरुन राजकारण चांगलेच तापले असताना आता पुन्हा एकदा नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना ‘जय गुजरात’ ची घोषणा दिली आहे. त्यामुळे आता विरोधकांकडून एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात (Pune) जयराज स्पोर्ट्स व कन्व्हेन्शन सेंटरचा (Jayaraj Sports and Convention Center) उद्घाटन समारंभात बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित होते. आपल्या भाषणाची सांगता करताना एकनाथ शिंदे यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात अशी घोषणा दिली आहे. त्यामुळे आता विरोधक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत आहे. या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत शेरोशायरी केली आणि भाषणाच्या शेवटी जय गुजरातची घोषणा दिली.

तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये जेव्हा आमचा पक्ष सोडला होता तेव्हा बाळासाहेबांचे विचार घेऊन जात आहे असं सांगितले होते मात्र बाळासाहेबांचे विचार जय गुजरात कधीच होऊ शकत नाही अशी टिका शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.

राजकीय आशीर्वादाने कत्तलखाने सुरु, पोलिसांचा सहभाग, कारवाई करा; आमदार खताळ आक्रमक

जय हिंद माझा राष्ट्र प्रेम आहे तर जय महाराष्ट्र माझा महाराष्ट्र प्रेम आहे. पण जय गुजरात …, गृहमंत्री अमित शाह यांना खुश करण्यासाठी एकनाथ शिंदे जय गुजरात म्हणत असल्याची देखील टीका किशोरी पेडणेकर यांनी शिंदेंवर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांची गंभीर दखल घेतली पाहिजे अशी मागणी देखील ठाकरे गटाच्या नेत्या किशोर पेडणेकर यांनी केली.

follow us