Download App

“अजितदादांनी तीन वेळा शब्द फिरवला, आता विधानसभेला मदत केली तरच”.. अंकिता पाटलांचा थेट इशारा

Elections 2024 : लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या (Lok Sabha Election) असताना महायुतीत सर्व काही आलबेल नाही याचा प्रत्यय नुकताच आला आहे. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त करत इशारा दिला आहे. आता आम्ही महायुतीत आहोत. पण, महाआघाडीत असताना अजित पवारांनी आम्हाला तीन वेळा शब्द दिला होता. नंतर शब्द फिरवून आमची फसवणूक केल्याचा आरोप करत विधानसभा निवडणुकीत (Elections 2024) मदत केली तरच आम्ही तुम्हाला लोकसभा निवडणुकीत मदत करू असा इशारा अंकिता पाटील (Ankita Patil) यांनी दिला. त्यांच्या या इशाऱ्यानंतर ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील धुसफूस उघड होऊ लागली आहे.

आधी आम्ही महाविकास आघाडीत होतो. त्यावेळी तीन वेळा शब्द देऊन तो फिरवण्यात आला. आमची फसवणूक करण्यात आली. आमच्या पाठीत खंजीर खुपसला. आता आम्ही महायुतीत आहोत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जे आमचे काम करतील त्यांनाच आम्ही लोकसभा निवडणुकीत मदत करू, असा इशारा अंकिता पाटील यांनी दिला.

महायुतीत अजित पवारांनी एन्ट्री घेतल्याने हर्षवर्धन पाटलांच्या अडचणी वाढल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुती जो उमेदवार देईल त्याचं काम करावं लागेल असे अजित पवार सातत्याने सांगत आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीतर्फे अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार याच उमेदवार असतील असे दिसत आहे. या राजकारणामुळे भाजपात आलेल्या हर्षवर्धन पाटील यांची मात्र चांगलीच कोंडी होताना दिसत आहे.

Ajit Pawar यांना बालेकिल्ल्यातच धक्का! लोकसभेला उमेदवारी न दिल्याने कट्टर समर्थक मातोश्रीवर

मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्ता भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता. त्यांच्या या पराभवात अजित पवार यांचीच रणनीती होती हे उघड झाले होते. आता तेच अजित पवार महायुती सोबत आहेत आणि महायुतीतील सर्वात मोठापक्ष भाजपात हर्षवर्धन पाटील आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कदाचित इंदापूरच्या जागेवरून तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण, अजित पवार या जागेवर दावा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, तरीही आगामी विधानसभा निवडणूक आम्ही लढणारच असे वक्तव्य हर्षवर्धन पाटील यांचे पुत्र राजवर्धन पाटील यांनी केले आहे.

follow us