Download App

रविंद्र धंगेकरांचा शिवसेनेत ‘उदय’ होणार ? थेट मंत्र्यांनीच मुलाचा वाढदिवस साजरा केलाय

धंगेकरांचा काँग्रेसमधून 'अस्त' तर शिवसेनेत 'उदय' होण्याची शक्यता आहे. धंगेकरांनी काही दिवसांपूर्वी स्वतः उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली आहे.

  • Written By: Last Updated:

Ravindra Dhangekar will join shivsena: माजी आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचे काँग्रेसमधील (Congress) स्थान सध्या डळमळीत झालंय. पालिका निवडणुकीसाठी नवी समिती जाहीर करण्यात आलीय. या समितीतून रविंद्र धंगेकरांना स्थान देण्यात आलेले नाही. ते काँग्रेस सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित ते शिवसेनेत (Shivsena) जाण्याची शक्यता आहे. तसे संकेत धंगेकरांनी दिले आहेत. शिवसेनेचे मिशन टायगरच्या मोहिमेत धंगेकर आता सेनेत प्रवेश करू शकतात. कारण गेल्या दिवसांमध्ये त्यांच्या हालचाली तशा सुरू झाल्या आहेत.

जास्त परताव्याचं आमिष, 700 ते 800 गुंतवणूकदारांना करोडोंचा गंडा; छ. संभाजीनगरमध्ये धक्कादायक घडलं

धंगेकरांचा काँग्रेसमधून ‘अस्त’ तर शिवसेनेत ‘उदय’ होण्याची शक्यता आहे. धंगेकरांनी काही दिवसांपूर्वी
स्वतः उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली आहे. त्या भेटीचे फोटो उदय सामंत यांनी ट्विट केले आहेत. 20 फेब्रुवारीला रवींद्र धंगेकर यांचा मुलगा प्रणव धंगेकर यांचा वाढदिवस होता. हा वाढदिवस पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये उदय सामंत व रविंद्र धंगेकर यांनी एकत्रित साजरा केला.

अजब मंत्री, गजब कारभार! तब्बल 20 महिने सांभाळलं ‘अस्तित्वात नसलेलं खातं’

तर कालच रवींद्र धंगेकर यांनी गळ्यात भगवा टाकलेला स्टेटस चर्चेत आला होता. रवींद्र धंगेकर यांनी त्यांच्या स्टेट्सला गळ्यात भगवं उपरणं घातलेला एक फोटो ठेवला होता. तसेच त्या फोटोवर स्टेट्सला ‘तेरे क़दमों के तले मिट्टी भी सोना बन गयी, जर हुआ दुश्मन जहाँ शमशीर तेरी तन गयी…’ हे गाणे ठेवले. त्यामुळे धंगेकर यांच्या स्टेट्सची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगलीय. त्याच आता मुलाचा वाढदिवसही मंत्री सामंतबरोबर साजरा केला आहे. त्यामुळे रवींद्र धंगेकर हे कधीही काँग्रेस सोडू शकतात, असे तर्कवितर्क लावले जात आहे.

काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदेंची भेट

धंगेकर यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची थेट मुंबईत भेट घेतली होती. त्या भेटीवर धंगेकर हे काँग्रेस सोडून शिवसेनेत जातील, अशी चर्चा सुरू झाली होती. परंतु धंगेकर यांनी या चर्चा फेटाळून लावत माझ्या वैयक्तिक कामासाठी मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, असे स्पष्टीकरण दिले होते.

follow us