Download App

Sanjay Kakade: माजी खासदार संजय काकडेंच्या पत्नी रुग्णालयात, अन्नातून विषबाधा झाल्याने प्रकृती खालावली

Usha Kakade: रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अन्नातून त्यांना विषबाधा झाली असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

  • Written By: Last Updated:

ex mp Sanjay Kakade wife Usha Kakade hospitilised in pune : भाजप नेते आणि माजी खासदार संजय काकडे ( Sanjay Kakade) यांच्या पत्नी उषा काकडे ( Usha Kakade) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अन्नातून त्यांना विषबाधा झाली असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुबी हॉस्पिटलकडून देण्यात आली आहे. तर काही वेगळ्या चर्चा सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून कुठलेही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

काहीतरी मोठं होणार… ? अर्थसंकल्पीय अधिवेशानादरम्यान मंत्री शिरसाट मनोज जरांगेंना भेटले

संजय काकडे हे पुण्यात बांधकाम व्यावसायिक आहेत. संजय काकडे ग्रुप या नावाने त्यांची कंपनी आहे. ते राज्यसभेचे सदस्य राहिलेले आहेत. काकडे हे भाजपमध्ये असून, त्यांच्यावर निवडणुकीच्या काळात पक्षात वेगवेगळ्या जबाबदारा देण्यात आल्या होत्या. त्यांच्या पत्नीही बांधकाम क्षेत्राशी निगडीत आहे.


उषा काकडे या सामाजिक कार्यातही अग्रेसर

तर उषा काकडे या सामाजिक कार्यातही अग्रेसर आहेत. उषा काकडे या ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्याही संस्थापक आहेत. शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांसाठी युनिसेफ संस्थेसोबत भागीदारी करण्यात आलेली आहे. तसेच चित्रपट निर्मितीमध्येही उषा काकडे या आहेत.

follow us