काहीतरी मोठं होणार… ? अर्थसंकल्पीय अधिवेशानादरम्यान मंत्री शिरसाट मनोज जरांगेंना भेटले

Sanjay Shirsat Met Manoj Jarange : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून या अधिवेशनात संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून (Santosh Deshmukh Murder Case) , कृषीमंत्री माणिकराव कोकाटे प्रकरणावरून (Manikrao Kokate Case) तसेच महिला सुरक्षेवरून विरोधक महायुती (Mahayuti) सरकारवर हल्लाबोल करत आहे.
तर दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) देखील सरकारवर टीका करताना दिसत आहे. यातच मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. मनोज जरांगे यांची भेट घेतल्यानंतर मंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी मंत्री शिरसाट म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आलो होतो. त्यांच्या प्रकृतीबाबत चर्चा झाली. विद्यार्थींचे काही प्रश्न होते त्यावर देखील चर्चा झाली. तसेच या भेटी दरम्यान मनोज जरांगे यांनी शिंदे समितीत काम सुरू नसल्याचे लक्षात आणून दिले. तसेच तीन गॅझेट बाबत नोटिफिकेशन काढले नाही असे त्यांचे म्हणणे आहे. हे सर्व मुद्दे त्यांनी मांडले आहे, याबाबत सोमवारी मुंबईत गेल्यावर यावर आणखी एक बैठक बोलावता येणार का याबाबत पाहतो आणि या प्रकरणात मुख्यमंत्री स्वतः यात लक्ष घालत आहे. अशी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
तर यावेळी त्यांनी जालन्यात व्हायरल झालेल्या मारहाणीच्या व्हिडिओबाबत देखील प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, पीडित तरुण दारू पिल्याचे व्हिडीओ आले आहे मात्र तरी देखील चटके देण्याचे भाग निंदनीय आहे, असे चटके देणे योग्य आहे. हा भयानक व्हिडीओ आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
दुसरीकडे त्यांनी माध्यमाशी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे. संजय राऊत यांनी महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांना स्थान नसल्याची प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना केली होती.
25 वर्षांनंतर न्यूझीलंड करणार इतिहासाची पुनरावृत्ती की भारत मारणार बाजी? जाणून घ्या सर्वकाही …
त्यावर उत्तर देत संजय शिरसाट म्हणाले की, या मूर्ख लोकांना सांगतो कोण, तुमचं कोणी ऐकत नाही, शरद पवार यांचा आता फोनही येत नाही, काँग्रेस विचारत नाही, भास्कर जाधव विरोधीपक्ष नेते होणार नाही माहीत असून त्यांना उचकवण्याचा प्रयत्न केले जात आहे. असं संजय शिरसाट म्हणाले.