Download App

Kasba By Election : रविंद्र धंगेकरांचा प्रचार करणं भोवलं! सहा जणांची पक्षातून हकालपट्टी

पुणे : पुणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मोठी खळबळ झालीय. कसबा पोटनिवडणुकीत रिंगणात उतरलेले महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकरांचा प्रचार मनसेच्या काही कार्यकर्त्यांकडून केला जात होता.

राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतरही मनसेचे काही पदाधिकारी रवींद्र धंगेकर यांचा प्रचार करत होते. त्यामुळे मनसेकडून या कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. सहा जणांवर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे.

या निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटक या नात्याने ठाकरे गटाने कसब्यात रवींद्र धंगेकर यांना तर चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे नाना काटे यांना पाठिंबा दिला. तर मनसेचे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कसब्यात भाजपला मदत करण्याचे आदेश दिले आहेत

असाही योगायोग, २२ फेब्रुवारी : शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय प्रवेशाची तारीख

कारवाई करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये रवींद्र खेडेकर, सागर पांगारे, गोपी घोरपडे, अनिल बांढांगे, रिझवान मिरजकर, प्रकाश ढमढेरे या कार्यकर्त्यांवर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे. हे गेल्या काही वर्षांपासून पक्षात कार्यरत नसल्याची माहिती शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी दिली आहे.

Tags

follow us