असाही योगायोग, २२ फेब्रुवारी : शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय प्रवेशाची तारीख

  • Written By: Published:
असाही योगायोग, २२ फेब्रुवारी : शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय प्रवेशाची तारीख

शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज नेते. शरद पवार यांच्या राजकारणाची सुरुवात होईल पाच दशक झाली तर देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाची सुरुवात होऊन आता दोन दशक उलटून गेलीत. पण या दोन्ही नेत्यांमध्ये एक गोष्ट समान आहे. ती आजची तारीख म्हणजे २२ फेब्रुवारी.

शरद पवार यांच्या राजकारणाची सुरुवात

आजपासून ५६ वर्षांपूर्वी १९६७ साली शरद पवार यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली. शरद पवार यांच्या राजकीय जीवनाचा सुवर्णमहोत्सवी प्रवास आता हीरक महोत्सवाच्या दिशेने सुरू आहे.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी एक ट्विट करून पवार यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा केली आहे. अगदी कमी वयात आमदार म्हणून निवडून येत शरद पवार राजकारणात सक्रिय झाले. आमदार, मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री असा टप्पा शरद पवार यांनी पार केला आहे.

हेही वाचा : ठाकरेंच्या देव्हाऱ्यातला ‘तो’ धनुष्यबाणही एकनाथ शिंदेंचाच, शिंदे गटाकडून ठाकरेंवर हल्ला

देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाची सुरुवात

योगायोगाने आजच्याच दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय जीवनाला ३१ वर्षांपूर्वी १९९२ मध्ये सुरुवात झाली. देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय जीवनाचा रौप्यमहोत्सवी प्रवास आता सुवर्णमहोत्सवी वर्षांच्या दिशेने मोठ्या तडफेने सुरु आहे.

वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी देवेंद्र फडणवीस नागपूर महानगरपालिकेमध्ये सर्वात कमी वयाचे नगरसेवक म्हणून निवडून आले. पुढे लागोपाठ दोन वेळा नगरसेवक म्हणून देवेंद्रजी निवडून आले. नंतर महापौर आमदार, मुख्यमंत्री असा मोठा टप्पा देवेंद्र फडणवीस यांनी पार केला आहे.

हेही वाचा : Thackeray Vs Shinde : शिवसेना सध्या शिंदेंकडेच, पण ठाकरे गटाचे आमदार ‘सुरक्षित’

महाराष्ट्राचं राजकारण या दोन नावाभोवतीच

आजघडीला महाराष्ट्राचं राजकारण या दोन नावाभोवतीच फिरत आहे. २०१४ साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी राज्याच्या राजकारणात आपलं स्थान तयार केलं. त्यानंतर शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोनच नावाभोवती राजकारण फिरत आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक दिग्गज नेते भाजपात आणून स्वतःच स्थान बळकट केलं. पण महाविकास आघाडी सरकार स्थापन करून शरद पवार यांनी फडणवीस आणि भाजपाला धक्का दिला.

देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला धक्का देत राज्यात नवीन समीकरण यशस्वी करून दाखवलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube