Thackeray Vs Shinde : शिवसेना सध्या शिंदेंकडेच, पण ठाकरे गटाचे आमदार ‘सुरक्षित’
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना कोणाची या प्रश्नांवर उद्धव ठाकरे यांना तातडीने दिलासा देण्यास नकार दिला. याबाबत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला नोटीस पाठवण्यात येणार असून पुढील सुनावणी २ आठवड्यानंतर होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृतवखाकील तीन न्यायमूर्ती समोर झालेल्या सुनावणीत हा निर्णय देण्यात आला.
आजच्या निर्णयात ठाकरे गटाला अंशतः दिलासा मिळला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह पुढील सुनावणी पर्यत वापरण्याची मुभा देण्यात आली आहे.
हेही वाचा : Live Blog | Thackeray Vs Shinde : शिवसेना-धनुष्यबाण कोणाचं? कोर्टात सुनावणी सुरु
तसेच हि सुनावणी होपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या सोबत असलेल्या आमदार आणि खासदार यांच्यावर कारवाई करणार नाही, अशी ग्वाही शिवसेनेच्या वकिलांनी कोर्टात दिली. त्याची ग्वाही निर्णयात नसली तरी त्यांचे मत न्यायालयाने नोंदवून घेतले आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात सुरु होणाऱ्या राज्य अधिवेशनात ठाकरे गटाच्या आमदारांना शिवसेनचे व्हिप मानण्याची गरज राहणार नाही.
दुसरीकडे ठाकरे गटाला एक धक्का बसला आहे, तो म्हणजे बँक खाती, कार्यालये शिंदे यांच्या शिवसेनेला देण्यास प्रतिबंध करावा अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केली, पण या मागणी थेट नकार दर्शवत आम्ही फक्त निवडणूक आयोगाच्या निकालावर निर्णय देऊ अशी भूमिका न्यायालयाने घेतली. त्यामुळे इतर कायद्याचा आधार घेत आपले योग्य ठिकाणी आपले मत मांडावे अशी सूचना न्यायालयाने केली.