Download App

‘फडणवीस आणि शिंदेंना जनतेने सपशेल नाकारले’; कसब्यातील विजयानंतर जयंत पाटलांचा हल्लाबोल

  • Written By: Last Updated:

पुणे : ज्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Govt) पाडण्यात आले, ज्याप्रमाणे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खराब करण्यात आली, या सर्व गोष्टींचा निषेध जनतेने केला आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान कसबा येथून भाजपची पकड सुटली आहे. फडणवीस आणि शिंदेंना जनतेने पूर्णपणे नाकारले आहे, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.

संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या कसब्याच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपच्या हेमंत रासने यांना पराभवाची धूळ चारली आहे. २८ वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेल्या गडाला धंगेकरांनी सुरुंग लावला. आता यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. धंगेकरांच्या विजयाबद्दल बोलतांना जयंत पाटील यांनी सांगितले की, धंगेकर यांच्यावर जनतेने विश्वास ठेऊन त्यांना भरघोस मतदान केलं. धंगेकर यांनी रासने यांना ११ हजार मतांनी पराभवाची धूळ चारत विधानसभेत पाऊल ठेवलं. आता कसबा येथून भाजपची पकड सुटली असून फडणवीस आणि शिंदेंना जनतेने सपशेल नाकारलं असल्याचं त्यांनी सांगितलं.

ते म्हणाले, ज्या प्रकारे महाविकास आघाडी सरकार पाडण्याच काम झालं, शिंदे-फडणवीस सरकारने ज्या काही राजकीय संस्कृतीला बाधक ठरणाऱ्या गोष्टी केल्या. त्याचा विरोध जनतेने केला. मतदारांनी रासने यांना धोबीपछाड करून धंगेकरांना मतदारांनी विजयाचा कौल दिला, यावरुन मतदार शिंदे-फडणवीस यांच्या कसब्यातील कामाविषयी नाराज असल्याचं दिसतं असंही त्यांनी सांगितलं.

`Pune BJP म्हणजे मोहोळ, मुळीक, बीडकर आणि रासने हे काही योग्य नाही`

गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचाच उमेदवार कसबा निवडणुकीत विजयी होत होता. याची आठवण करून देतानाच चिंचवड पोटनिवडणूक आमचा भलेही पराभव झाला असला तरी विरोधात पडलेली मते एकत्र केली असती तर भाजपचा तिथेही पराभव झाला असता, असेही जयंत पाटील म्हणाले. दरम्यान, फडणवीस – शिंदे यांची जी युती झाली आहे, त्याबाबत राज्यातील जनता प्रचंड नाराज आहे हे कसबा निवडणुकीतून समोर आले आहे असेही पाटील म्हणाले.

Tags

follow us