समुद्रात जाणं आलं अंगलट! तारकर्ली समुद्रात पुण्याचे पाच जण बुडाले, दोघांचा मृत्यू

Tarkarli sea मध्ये पुण्यातील पाच पर्यटक येथे पाण्यात उतरले असताना बुडाले आहेत. यातील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Tarkarli Sea

समुद्रात जाणं आलं अंगलट! तारकर्ली समुद्रात पुण्याचे पाच जण बुडाले, दोघांचा मृत्यू

Five people from Pune drowned in Tarkarli sea two died : सध्या सगळीकडे पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्यात समुद्र किनारा म्हटलं की, अलोट गर्दी आणि दुर्दैवी घटना हे अनेकदा पाहायला मिळतं. अशी एक घटना सिंधूदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालूक्यातील तारकर्ली समुद्रात घडली आहे.

सोशल मीडियावर NO अश्लील कटेंट! इन्फ्लुएंर्सना मोठा झटका, सरकार करतंय जोरदार तयारी

पुण्यातील पाच पर्यटक येथे पाण्यात उतरले असताना बुडाले आहेत. यातील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दोघे बाचावले असून एक जण गंभीर जखमी आहे. हे पाच जण जेव्हा आंघोळीसाठी जात होते तेव्हा त्यांना इतर नागरिकांनी खबरदारी घेण्याच्या सुचना दिल्या होत्या. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

शिंदे गटातील नेत्याच्या दाव्याने राज्यात खळबळ; म्हणाले, कोणत्याही क्षणी आदित्य ठाकरेंना अटक…

त्यानंतर जेव्हा ते बुडाले तेव्हा उपस्थितांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर तिघांनाच पण्यातून बाहेर काढण्यात यश आले. यातील दोघा जणांची प्रकृती ठीक आहे. तर एक जण गंभीर आहे. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

यामध्ये शुभम सुशील सोनवणे (हडपसर, पुणे) रोहित बाळासाहेब कोळी (हडपसर, पुणे) यांचा मृत्यू झाला आहे. तर ओंकार रामचंद्र भोसले (पुणे) याची प्रकृती गंभीर आहे. अशी माहिती मालवण पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली. तसेच ते बचावलेल्या दोघांकडे पुढील तपास करत आहेत.

Exit mobile version