Download App

Pune : मोहोळ, मुळीक यांची झोप उडणार? ईशान्येत चाणाक्य ठरलेला नेता लोकसभेला इच्छुक

पुणे : खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लागणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजपने (BJP) थेट आता 2024 च्या निवडणुकांसाठी तयारी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर बापट यांच्यानंतर पुणे लोकसभेचा (Pune Loksabha) भाजपकडून चेहरा नेमका कोण असणार अशा चर्चांना सुरुवात झाली आहे. आतापर्यंत पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी खासदार संजय काकडे आणि बापट यांच्या सुनबाई स्वरदा बापट यांच्या नावाच्या चर्चा आघाडीवर होत्या.

मात्र अचानक या नावांना मागे टाकत एक नाव चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक, भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर (Sunil Deodhar) हे पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती आहे. भाजपचे राष्ट्रीय नेतृत्वही देवधर यांच्या नावावर गांभीर्याने विचार करत असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. पुण्यात संघाला मानणारा मोठा वर्ग आहे, त्यामुळे देवधर यांच्या उमेदवारीचा फायदा होऊ शकतो, असा मतप्रवाह भाजपमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. (Former National Secretary of BJP Sunil Deodhar is willing to contest from Pune Lok Sabha Constituency)

PM मोदी, अमित शाहंनी अत्यंत विचारपूर्वक मला… : साईडलाईनच्या चर्चांवर चंद्रकांतदादांचा मोठा खुलासा

पुण्यात मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या कसबा पोटनिवडणुकीत भाजपला हक्काचा मतदासंघ गमवावा लागला. काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा मोठ्या मताधिक्क्याने पराभव केला. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजप आतापासूनच सतर्क झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळेच भाजपचे नेतृत्व लोकसभा निवडणुकीसाठी नवीन आणि तगड्या चेहऱ्याच्या शोधात आहे. अशात देवधर निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याने त्यांच्या नावावर गांभीर्याने विचार सुरु असल्याचे सांगितले जात आहे.

लोकसभेच्या तयारीसाठी सचिव पदाच्या जबाबदारीतून मुक्तता?

काही दिवसांपूर्वीच केंद्रीय पदाधिकाऱ्यांची नवी यादी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातून राष्ट्रीय महासचिवपदी विनोद तावडे यांना कायम ठेवण्यात आले आहे. तर दोन महिने सुट्टीवर असलेल्या पंकजा मुंडे यांनाही दुसऱ्यांदा राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी देण्यात आली आहे. पंकजा मुंडेंसह विजया राहटकर यांना राष्ट्रीय सचिव म्हणून पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर महाराष्ट्रातून सुनील देवधर यांचं नाव वगळण्यात आलं आहे. लोकसभेच्या तयारीसाठीच त्यांना या जबाबदारीतून मुक्त केले का असा सवाल विचारला जात आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत ‘रासप’ही आखाड्यात; महादेव जानकरांनी फुंकलं रणशिंग!

कोण आहेत सुनील देवधर?

सुनील देवधर हे मुळचे पुण्यातीलच. त्यांचा जन्मही पुण्यातच झाला. लहानपणापासून संघाच्या मुशीत तयार झालेल्या देवधर यांनी तब्बल 12 वर्ष ईशान्य भारतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक काम केले आहे. यातून त्यांनी ईशान्येतील सर्व राज्यांमध्ये संघ आणि भाजप वाढविण्यासाठी मोठे काम केले. याशिवाय 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघात संघटनेची आणि बुथ बांधणीची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर 2018 मध्ये त्रिपुरात डाव्यांच्या 25 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावत भाजपला सत्तेत बसवलं होतं.

Tags

follow us

वेब स्टोरीज