PM मोदी, अमित शाहंनी अत्यंत विचारपूर्वक मला… : साईडलाईनच्या चर्चांवर चंद्रकांतदादांचा मोठा खुलासा

PM मोदी, अमित शाहंनी अत्यंत विचारपूर्वक मला… : साईडलाईनच्या चर्चांवर चंद्रकांतदादांचा मोठा खुलासा

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी अत्यंत विचारपूर्वक मला उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाची जबाबदारी दिली आहे, असा खुलासा करत चंद्रकांत पाटील यांनी मागील अनेक दिवसांपासून साईडलाईन केले असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. ते ‘सतीश मिसाळ एज्युकेशनल फाउंडेशन’च्या ‘ब्रिक्स ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट’च्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते. (Narendra Modi, Amit Shah and J. P. Nadda very thoughtfully gave me the charge of Ministry of Higher and Technical Education)

फडणवीस सरकारमध्ये दोन नंबरचा दर्जा, महसूल, सहकार, सार्वजिनक बांधकाम, कृषी अशा तब्बल 8 खात्यांचा कार्यभार पाटील यांच्याकडे होता. मात्र शिंदे सरकारमध्ये त्यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाची जबाबदारी दिली गेली. याशिवाय प्रदेशाध्यक्ष पदावरुनही त्यांची उचलबांगडी झाली. त्यामुळे पाटील यांना कमी महत्वाचे खाते देत साईडलाईन केल्याच्या चर्चा होत्या. याच चर्चांवर त्यांनी आज पूर्णविराम दिला.

‘CM शिंदेंची इतिहासात लाचार अन् गुडघे टेकणारे मुख्यमंत्री म्हणून नोंद होणार’

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

2014 ते 2019 या काळात आठ खात्यांचा पदभार असणाऱ्याला उच्च व तंत्रशिक्षण खाते देऊन बाजूला टाकले, असे अनेकांना वाटले. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जे. पी. नड्डा यांनी खूप विचारपूर्वक माझ्याकडे या मंत्रालयाची जबाबदारी विचारपूर्वक दिली आहे. केंद्र सरकारने 2020 मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली. पण तत्कालीन ठाकरे सरकारने या धोरणाची अंमलबजावणी करण्यास विरोध दर्शविला. त्यामुळे तीन वर्षे हे धोरण राज्यात राबविता आले नाही. त्यानंतर माझ्याकडे जबाबदारी देण्यात आली.

माझ्याकडे जबाबदारी आल्यानंतर जवळपास पंधराशे कॉलेजमध्ये या धोरणाची अंमलबजावणी झाली. पुढील वर्षी सुमारे पाच हजार कॉलेज आणि 42 विद्यापीठांमध्ये हे धोरण राबविण्यात येणार आहे. याचा फायदा राज्यातील 33 लाख विद्यार्थ्यांना होणार आहे.

‘इंडिया’ आघाडीचा मुंबईतील बैठकीचा कार्यक्रम जाहीर, कधी काय होणार ते जाणून घ्या

विद्यार्थी परिषदेपासून शिक्षण क्षेत्रात काम करत असल्याने मला प्रत्येक संकल्पनेची माहिती आहे. माझ्या विभागाचे आयएएस दर्जाचे सचिवही माझ्याशी बोलायला घाबरतात. शिवाय नवीन शैक्षणिक धोरण राबवणे थोडे जिकीरीचे आहे. अशावेळी नवीन कोणी शिक्षणमंत्री झाला असता, तर त्याच्यासाठी यूजीसी, एआयसीटीई, बी-आर्च, एम-आर्च, माहेड, सीईटी या संकल्पना समजून घेणे अवघड झाले असते. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाने माझ्यावर विश्वास टाकून, शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी मला शिक्षणमंत्री केले, असे पाटील म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube