Pune Viral Video : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातून अनेक धक्कादायक घटना सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. तर आता पुण्यातून (Pune) एका 4 वर्षीय चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये (Pune Viral Video) चिमुकली एका बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या फ्लॅटच्या खिडकीमध्ये अडकली असल्याचे दिसून येत आहे. या चिमुकलीला अग्नीशमक दलाचे जवानाने वाचवले आहे.
या धक्कादायक व्हिडिओबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कात्रजच्या गुजर निंबाळकरवाडी, खोपडे नगर येथील सोनवणे बिल्डिंगमध्ये सुट्टीवर असणारे पुणे अग्निशमन दलाचे कर्मचारी योगेश अर्जुन चव्हाण (Yogesh Arjun Chavan) यांना सकाळी 9 च्या सुमारास शेजारी राहणाऱ्या उमेश सुतार यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून आल्याने योगेश चव्हाण यांनी आपल्या गॅलरीकडे धाव घेतली तेव्हा त्यांना दिसले की 4 वर्षीय चिमुकली बाविका चांदणे ही तिसऱ्या मजल्यावरील बंद फ्लॅटच्या खिडकीत अडकली असून ती बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होती.
#PMCPune आज कोथरूड अग्निशमन केंद्रातील सुट्टी असलेला जवान योगेश चव्हाण यांनी काञज, गुजरवाडी, खोपडे नगर येथील एका इमारतीत 3 मजल्यावर घर बंद असताना एक छोटी मुलगी खिडकीतून पडण्याच्या स्थितीत दिसताच तातडीने जवानाने धाव घेत 4 वर्षाच्या चिमुकलीचा जीव वाचवत आपले कर्तव्य बजावले #punefire pic.twitter.com/zS06tsxf4C
— Nilesh Sharad Mahajan (@Nileshmahajn101) July 8, 2025
हे बघताच योगेश चव्हाण यांनी इमारतीकडे धाव घेतली मात्र जेव्हा ते तिसऱ्या मजल्यावर पोहचले तेव्हा त्यांना घराला कुलूप दिसला. चिमकुलीची आई मोठ्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी गेली होती. त्यामुळे योगेश त्यांच्या येण्याची वाट पाहात होते. यानंतर बाविकाची आई घरी येताच योगेश यांनी तातडीने घराचे दार उघडले आणि बेडरुमच्या खिडकीत लटकत असलेल्या चिमुकलीकडे धाव घेत मुलीला बेडरुमच्या खिडकीतून आता घेतले. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
बुधवारी भारत बंदची हाक! 25 कोटी कर्मचारी उतरणार रस्त्यावर; बँकिंगसह अन्य सेवा होणार ठप्प