Download App

आधी अपात्रतेतून अभय; आता मोठी मागणी मान्य : पवारांच्या आमदारावर अजितदादांचे प्रेम कायम!

पुणे : राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे शिरुरचे आमदार अशोक पवार (Ashok Pawar) यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या हवेली तालुक्यासाठी (Haveli Taluka) लोणी काळभोर इथे अप्पर तहसीलदार कार्यालयाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय आज (2 नोव्हेंबर) जारी करण्यात आला आहे. स्वतः अशोक पवार यांनी  समाज माध्यमातून याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांचे आभार मानले.

अजितदादा-अशोक पवारांची पुन्हा जवळीक?

दरम्यान, अप्पर तहसील कार्यालयाला मान्यता मिळताच अजित पवार यांनी सोबत न येणाऱ्या अशोक पवार यांची मोठी मागणी केल्याची चर्चा आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा दोघांमधील जवळीकतेच्या चर्चा रंगल्या आहेत. यापूर्वी अजित पवार गटाने विधिमंडळाकडे आमदार अपात्रतेची याचिका दाखल करताना शरद पवार गटातील तीन आमदारांची नावे वगळली होती. यात अशोक पवार यांचे नाव होते. अशोक पवार यांची सत्ता असलेला घोडगंगा सहकारी साखर कारखाना अडचणीत आहे. या कारखान्यासंदर्भातही काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी पुण्यात बैठक घेतली होती.

ललित पाटीलच्या जीवाला धोका; वकिलाचा न्यायालयात मोठा दावा, पोलीस कोठडी वाढ

अजितदादांचे खंदे समर्थक म्हणून अशोक पवारांची ओळख :

अजितदादा आणि अशोक पवार या दोघांचे संबंध एकदम जवळचे आहेत. त्यांचे खंदे समर्थक म्हणून अशोक पवार ओळखले जातात. त्यामुळे ते अजितदादांसोबत राहतील अशी अटकळ पहिल्यापासून होती. रविवारी (2 जुलै) अजित पवार यांचा शपथविधी पार पडला तेव्हा अशोक पवार राजभवनात उपस्थित होते. पण प्रत्यक्षात त्यांनी शरद पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला. तीनच दिवसात त्यांनी भूमिका बदलत शपथविधीवेळी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून बोलावलं होतं. त्यामुळे आम्ही गेलो होतो. पण त्यावेळी खोटं बोलून आमच्याकडून सह्या घेतल्या, असा खुलासा त्यांनी केला होता.

Maratha Reservation : नवले पुलावर जाळपोळ; मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल!

शरद पवार यांच्यासोबत राहणारे अशोक पवार पुण्यातील एकमेव आमदार :

पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या 10 आमदारांपैकी इंदापूरचे दत्तात्रय भरणे, वडगाव शेरीचे सुनील टिंगरे, पिंपरीचे अण्णा बनसोडे, मावळचे सुनिल शेळके, आंबेगावचे दिलीप वळसे पाटील, खेडचे दिलीप मोहिते हे आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत. तर चेतन तुपे यांनी अद्यापही त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. पण आमदार पवार हे शरद पवारांसोबत कायम राहिले आहेत. पण त्यानंतरही राग न धरता अजितदादा अशोक पवार यांच्या मदतीसाठी धावून येत असल्याचे, त्यांच्या मागण्या प्राधान्याने मान्य करत असल्याचे दिसून येत आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज