पुणे : शहरातील कुख्यात गुंड शरद मोहळची आज (दि. 5) कोथरूड परिसरातील सुतारदरा येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर खळबळ उडाली असून, आता मोहोळचा गेम करणाऱ्या तीन पैकी एका हल्लेखोराचे नाव समोर आले आहे. मोहोळचा साथीदार असलेल्या साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर असे मोहोळवर गोळीबार करणाऱ्या तीनपैकी एका आरोपीचे नाव आहे. पोळेकर याने त्याच्या इतर साथीदारांसह शरद मोहोळ (Sharad Mohol) गोळीबार केला यात मोहोळ गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर मोहोळला कोथरूड येथील एका खासगी रूग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आर्थिक आणि जमिनीच्या वादातून शरद मोहोळ याचा खून झाल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. (Gangster Sharad Mohol Murder Update )
कुख्यात गुंड मोहोळची हत्या कुणी केली ? गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट तपासाची दिशाच सांगितली !
भर दुपारी खून झाल्याने खळबळ
कोथरूड परिसरातील सुतारदरा दवाखाना परिसरात शरद मोहोळवर दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास मोहोळवर 3 ते 4 अज्ञातांनी गोळीबार केला. या हल्ल्यात मोहोळ गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला कोथरूड परिसरातील एका खासगी रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान मोहोळचा मृत्यू झाला. भर दुपारी अशा प्रकारची घटना घडल्याने मोठी दहशत परसली असून, हा हल्ला टोळीयुद्धतून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात होता. त्यानंतर आता मोहोळचा खून त्याच्याच साथीदार असलेल्या साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर याने आणि त्याच्या इतर साथीदारांनी केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
शरद मोहोळ खून प्रकरण : शेलार गॅंगची एक धमकी गॅंगवारसाठी ठरली ठिणगी..?
कोण आहे शरद मोहोळ?
मोहोळने येरवडा कारागृहात विवेक भालेरावच्या साथीने दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असलेला आरोपी कतील सिद्दीकीचा खून केला होता. या प्रकरणात जामीनही मिळाला होता. जुलै 2022 मध्ये मोहोळला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपारही करण्यात आले होते. शरद मोहोळ हा पुण्यातील कुख्यात गुन्हेगार असून, त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. मोहळला पिंटू मारणे हत्येप्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला या प्रकरणात जामीन मिळाला होता. मात्र, दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांच्या अपहरणात त्याला पुन्हा अटक झाली होती.
बोळीतून आले, चार राऊंड फायर अन् पसार; पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
पत्नी स्वाती मोहोळ यांचा भाजप प्रवेश
काही दिवसांपूर्वीच शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांना त्याने राजकारणात उतरवण्याचं ठरवलं. कोथरुड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत स्वाती मोहोळ यांनी भाजपात प्रवेश केला. मोहोळ यांनी राजकारणात एन्ट्री केल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर मोहोळ गॅंगला राजकारणातून सपोर्ट मिळतोयं, असंही दबक्या आवाजात बोललं जात होतं. तर स्वाती मोहोळ यांच्या भाजप प्रवेशामुळे चंद्रकांत पाटील यांना कोथरुड मतदारसंघातून मदत मिळणार असल्याचीही शक्यता राजकीय वर्तवण्यात आली होती.