बोळीतून आले, चार राऊंड फायर अन् पसार; पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

बोळीतून आले, चार राऊंड फायर अन् पसार; पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

Sharad Mohol : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याचा लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीच हत्या करण्यात आली आहे. घरालगतच्या परिसरातच मोहोळ याच्यावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आलायं. या गोळीबारात अज्ञातांनी दुचाकीवर येत चार राऊंड फायर करत त्याच्यावर गोळीबार केलायं. गोळीबारानंतर जखमी शरद मोहोळवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, मोहोळची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

मी फक्त ढकललं, मारहाण केली नाही; अजितदादांसमोर ‘भाई’ गिरी करणाऱ्या भाजप आमदारांची स्पष्टोक्ती

नेमकं काय घडलं?
पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा वाढदिवस असल्याने शरद मोहोळ घरीच होता. घरालगतच्या परिसरात चालत असतानाच बोळीतून काही अज्ञातांनी दुचाकीवर येत चार राऊंड फायर करत त्याच्यावर गोळीबार केला आहे. या गोळीबारानंतर आरोपी पसार झाले आहेत.

रामायण मालिकेतल्या सीतेची पंतप्रधान मोदींना विनंती; म्हणाल्या, “अयोध्येच्या मंदिरात प्रभू …”,

या घटनेनंतर जखमी शरद मोहोळ याला प्रत्यक्षदर्शींनी कोथरुडच्या सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांकडून मोहोळवर उपचार सुरु होते. अखेर 4 वाजताच्या सुमारास शरद मोहोळ याचा पोलिसांनी मृत्यू झाल्याचं घोषित केलं आहे.

रोहित पवारांच्या बारामती अ‍ॅग्रोवर ईडीचे छापे, आव्हाड म्हणाले, ‘आपलेच घरभेदी सहकारी सामील’

कुख्यात गुंड शरद मोहोळ यांच्यावर सुतारदरामध्ये दुपारी दीडच्या सुमारास काही अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात शरद मोहोळ याच्या खांद्यावर गोळी लागलेली आहे. या घटनेचा पोलिसांकडून सर्वच बाजूने तपास सुरु असून हा गोळीबार कोणी केलायं याचा तपास सुरु आहे. यासंदर्भातील माहिती कुटुंबियांकडून माहिती घेतली जात असल्याचं पोलिस उपायुक्त संदीप कदम यांनी सांगितलं आहे.

तसेच या घटनेनंतर घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी पोलिसांकडून सुरु असून घटनास्थळी क्राईम ब्रॅंचंच पथक दाखल झालं असून तपास पूर्ण झाल्यानंतर घटनेबद्दलच्या सर्वच गोष्टी समोर येणार आहेत. अद्याप कोणावरही संशय व्यक्त करण्यात आला नसून लवकरच आरोपींपर्यंत पोहोचून कडक कारवाई करण्यात येणार असल्याचंही पोलिस उपायुक्तांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, शरद मोहोळ याचा मृत्यू झाल्याचं समोर आल्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पुणे जिल्हा रुग्णालय ससून रुग्णालयात रवाना करण्यात आला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube