पिंपरीचे ‘बोर्से ब्रदर्स’ गजाआड! खासगी कंपनीत नोकरीच्या आडून शहरात गांजाचा ‘पिवळा’ धंदा…

Ganja Sold in Turmeric Packets स्वयंपाकातील हळद बनली गांजाचं 'कव्हर'! पुण्यात तस्करीची नवी 'हायटेक' मोडस ऑपरेंडी उघड

पिंपरीचे 'बोर्से ब्रदर्स' गजाआड! खासगी कंपनीत नोकरीच्या आडून शहरात गांजाचा 'पिवळा' धंदा...

पिंपरीचे 'बोर्से ब्रदर्स' गजाआड! खासगी कंपनीत नोकरीच्या आडून शहरात गांजाचा 'पिवळा' धंदा...

Ganja Sold in Turmeric Packets, Two Arrested With 16 Kg Stock By Pune Police : स्वयंपाकातील हळदीच्या डब्यात ‘नशा’ दडलेली असेल, असा विचारही कोणाच्या मनात आला नसेल, पण पुण्याच्या बाणेर पोलिसांनी ड्रग्ज तस्करांची एक अशी मोडस ऑपरेंडी उघड केली आहे, ज्याने खुद्द खाकी वर्दीही चक्रावून गेली. खासगी कंपनीत नोकरीचा बनाव करत दोन सख्या भावांनी हळदीच्या पाकिटांतून गांजाची होम डिलिव्हरी सुरू केली होती. मात्र, बाणेर पोलिसांच्या एका ‘सर्जिकल स्ट्राईक’ने या हायप्रोफाईल तस्करांचा पिवळा धंदा उघड केला आणि तब्बल १६ किलो गांजासह परदेशी चलन जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

खासगी कंपनीत नोकरी, पण छुप्या मार्गाने ‘नशा’ विक्री

अभिषेक बोर्से आणि अक्षय बोर्से (दोघेही रा. पिंपरी-चिंचवड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघेही एका नामांकित खासगी कंपनीत नोकरी करत असल्याचे भासवून लोकांचा संशय टाळायचे. मात्र, प्रत्यक्षात ते पुण्याच्या विविध भागात गांजाची तस्करी करत होते. पोलिसांना चकवा देण्यासाठी त्यांनी गांजा चक्क हळदीच्या पाकिटात पॅक करून विकण्याची क्लृप्ती लढवली होती.

असा झाला पर्दाफाश…

बाणेर परिसरात दोन तरुण दुचाकीवरून गांजा विक्रीसाठी येणार असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बाणेर भागात सापळा रचला. संशयित दुचाकी येताच पोलिसांनी त्यांना अडवून झडती घेतली. सुरुवातीला त्यांच्याकडे केवळ हळदीची पाकिटे दिसली, मात्र पोलिसांनी ती पाकिटे उघडली असता, आतमध्ये हळदीऐवजी गांजाचे पाऊच आढळले. सुरुवातीला बाणेर येथे ३ किलो गांजा जप्त केला. त्यानंतर आरोपींच्या पिंपरी-चिंचवडमधील घरावर छापा टाकला असता, तिथे आणखी १३ किलो गांजाचा साठा आढळून आला. पोलिसांनी १६ किलो गांजासह काही विदेशी चलनही पोलिसांनी जप्त केले आहे.

मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू

या तस्करीचे जाळे किती खोलवर पसरले आहे, याचा तपास आता पोलीस करत आहेत. हा गांजा नेमका कोठून आणला जात होता आणि पुण्यातील त्यांचे ‘टार्गेट कस्टमर’ कोण होते, याचा शोध बाणेर पोलीस घेत आहेत.

Exit mobile version