पुणे : गरवारे बालभवनच्या संस्थापक-संचालक, बाल मानसशास्त्र अभ्यासक, लेखिका शोभा भागवत (Shobha Bhagwat) यांचे आज निधन झाले. मृत्यूसमयी शोभा भागवत यांचे वय ७६ वर्ष होतं. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर ‘वेड इन इंडिया’ चळवळ सुरु करा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
प्रामुख्याने मुलांसाठी लेखन करणऱ्याशोभाताई गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी होत्या. त्या पुण्यातील गरवारे बालभवनाच्या संचालिका होत्या. पुण्यात बालभवन ही संकल्पना राबवण्यामध्ये त्यांचे मोठं योगदान होतं. बालभवनसाठी त्यांचे मोठे योगदान आहे. त्या मुलांसाठी विविध उपक्रम राबवत असत. बाल मानसशास्त्राचा सखोल अभ्यास असल्याने त्यांनी बालभवनच्या माध्यमातून नवे मापदंड प्रस्थापित केले. पालकत्वावर त्यांचा विशेष अभ्यास होता. पालकत्तव हे शास्त्र, कला आहे आणि सतत करण्याचा अभ्यास आहे, हे त्यांनी आपल्याा कामातून दाखवून दिले.
Mahua Moitra म्हणाल्या, वस्त्रहरणानंतर आता महाभारतही होणार; एथिक्स कमिटीची हकालपट्टीची शिफारस
शोभा भागवत यांनी अनेक पुस्तके लिहिली. यामध्ये आमची मुले (मार्गदर्शनपर), गंमतजत्रा (बालसाहित्य), गारांचा पाऊस (मार्गदर्शनपर, बहुरूप गांधी (अनुवादित बालसाहित्य, मूळ इंग्रजी लेखक – अनु बंदोपाध्याय). मुल नावाचं सुंदर कोडं (मुलांच्या बोलांचे संकलन), विश्व आपलं कुटुंब (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक – कृष्ण कुमार), सारं काही मुलांसाठी (मार्गदर्शनपर अशी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.
प्रसिद्ध चित्रकार आभा भागवत या त्यांच्या कन्या होत्या. शोभा भागवत यांच्या निधनाने साहित्य आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.