आमची सभा होऊ नये म्हणून दंगलींचे कारस्थान, सरकारने दिला नपुंसकतेचा पुरावा; राऊतांचा घणाघात

आमची सभा होऊ नये म्हणून दंगलींचे कारस्थान, सरकारने दिला नपुंसकतेचा पुरावा; राऊतांचा घणाघात

Sanjay Raut : छत्रपती संभाजीनगर येथील किराडपुरा परिसरात जी दंगल झाली त्याचे जोरदार पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून विरोधी पक्षातील नेत्यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. खासदार संजय राऊत यांनी कालही सरकारवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा सरकारला घेरले आहे.

संजय राऊत म्हणाले, की ‘अनेक ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र दोन्ही धर्माच्या लोकांनी सामंजस्याची भूमिका घेतली. त्यामुळे अनर्थ घडला नाही. आता 2 एप्रिल रोजी शहरात महाविकास आघाडीची सभा होणार आहे.’

छत्रपती संभाजीनगरच्या ओहर गावात पुन्हा राडा; तुफान दगडफेकीनंतर परिस्थिती नियंत्रणात

‘ही सभा होऊ नये, कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली सभेला परवानगी मिळू नये यासाठी अशा प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. आमच्या सभांना परवानगी मिळू नये यासाठीचे सरकारचे हे कारस्थान आहे’, असा आरोप त्यांनी केला.

संजय राऊत म्हणत होते ते हेच दंगे का ? ; सोमय्यांकडून राऊत टार्गेट

‘मुंबईच्या मालवणी परिसरातही काल चकमक झाली. याआधी रामनवमीच्या मिरवणुकांवर कधी असे हल्ले झाले नव्हते. गुढीपाडव्याच्या इतक्या शोभायात्रा निघतात तेव्हाही असे कधी  घडत नाही. मात्र, आता शिवसेनेच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याने काही लोकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सरकारकडून काही लोकांना हाताशी धरून वातावरण बिघडविण्याचा तसेच जातीय व धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे’, असे राऊत म्हणाले.

ही तरी त्यांची नपुंसकता 

‘न्यायालयाने कालच हे सरकार नपुंसक असल्याचे म्हटले होते. या दंगली हा सरकारच्या नपुंसकतेचा पुरावा आहे. दंगली घडवणं, संबंधितांवर कारवाई न होणे तसेच दंगेखोरांना प्रोत्साहन देणे हा या सरकारच्या नपुंसकतेचाच पुरावा आहे’, अशी टीका राऊत यांनी केली.

दरम्यान, याआधी केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिले होते. ते म्हणाले, रामनवमीच्या दिवशी किराडीपुरा येथील प्राचीन मंदिराजवळ जर कोणी असं केलं असेल तर त्याच्यावर कारवाई करावी, अशा सूचना मी पोलीस आयुक्तांना दिल्य आहेत.  खैरेंचा आरोप खोटा आहे. त्यामुळे त्यांची वैद्यकिय तपासणी करण्याची गरज आहे. तसेच ते जर यामागे देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचा आरोप करत असतील तर त्यांना वेड्याच्या रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube