Gaurav Aahuja One-day police custody for not giving mobile : विद्येचे माहेर घर आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यात एका श्रीमंत बापाच्या पोरानं भररस्त्यात लघुशंका करत अश्लील कृत्य केल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र एक दिवस होऊनही या मुलाने पोलिसांना मोबाईल दिलेला नाही. त्यामुळे त्याला एक दिवसाची पोलीस कोठड सुनावण्यात आली आहे.
आता जेजुरी देवस्थानातही ड्रेस कोड! फाटक्या जीन्स, बरमुडा, शॉर्ट, स्कर्ट पेहराव करणाऱ्यांना मज्जाव…
यावर बोलताना गौरवचे वकील सुरेंद्र आपुने यांनी सांगितलं की, आज गौरव आहुजाला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. पोलिसांनी तपासादरम्यान आरोपीची कार जप्त केलेली आहे. तिच्या नंबर प्लेटशी छेडछाड केली गेलेली आहे. त्यावेळी त्याने अद्याप देखील पोलिसांना त्याचा मोबाईलदिलेला नसल्याने त्याला तो मोबाईल मिळवण्यासाठी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अशी माहिती गौरवचे वकील सुरेंद्र आपुने यांनी दिली.
तर गौरव सोबत असणारा भाग्येश ओसवाल ला न्यायालयील कोठडी देण्यात आलेली आहे. भाग्येश ओसवालच्या वकिलांकडून न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला. शेजारी बसणाऱ्या मित्राने गौरवला हे कृत्य करण्यास भाग पाडलं, त्याने असं केलं नसतं तर कदाचित गौरवने हे कृत्य केले नसतं. पोलिसांकडून पुन्हा पोलीस कोठडीची मागणी शेजारी बसणाऱ्या मित्र भागेश ओसवाल याने गौरवला उत्तेजित केले म्हणून त्याने हे कृत्य केले आहे
नेमकं काय घडलं?
शास्त्री नगर भागात घडलेली घटना शनिवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली असून, व्हायरल व्हिडिओतील मुलाची ओळख पटली असून त्याचे नाव गौरव अहुजा असे आहे. गौरव आणि त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. घटनेवेळी मद्यधुंद असलेल्या चालकाला लघुशंका करताना नागरिकांनी अडवले. त्यानंतर सबंधित युवकाने गाडीत बसल्यानंतर अडवणाऱ्या व्यक्तीला अश्लील हावभाव केले आणि भरधाव वेगात गाडी पुढे नेली. सदर चालक आणि त्याचा मित्र दोघेही बीएमडब्ल्यू गाडीतून वाघोलीच्या दिशेने वेगवान गतीने गाडी जात होते असे जाधव म्हणाले. स्थानिकांनी या घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग पोलिसांना सादर केले आहे, ज्यामुळे चौकशी सुलभ होण्याची शक्यता आहे.