Download App

साहेब मला माफ करा; पुण्यातील रस्त्यावर लघूशंका करणाऱ्या गौरव आहुजाचे कोणते शिंदे साहेब?

आता सर्वात मोठा प्रश्न आहे की शिंदे साहेब नेमका कोण आहेत? का गौरव आहुजाने माफीनाम्यात शिंदे साहेबांचं नाव घेतले?,

  • Written By: Last Updated:

Who is Shinde by Gaurav Ahuja? : पुण्यातील तरुण गौरव आहुजा रसत्यावर उभा राहुन लघुशंका केली. तसंच, दारुच्या नशेत असल्याने आणि त्याने काही अश्लिल चाळे केल्याने तो चर्चेत आला. त्याने पोलिसांचा (Ahuja) खाक्या मागं लागताच अचानक माफी मागितली. त्यामध्ये शिंदे साहेब मला माफ करा असं तो म्हणाला. त्यामुळे हे शिंदे साहेब नक्की कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आहुजाने आपल्या माफीनाम्यात शिंदे साहेबांचे पहिले नाव टाळले आहे. जर केवळ दारू पिऊन रस्त्यात गैरवर्तन करणाऱ्या एका गुन्हेगाराला कोणत्या तरी शिंदे साहेबांची माफी मागण्याची गरज भासते तर त्याचा अर्थ हा स्पष्ट आहे की, या प्रकरणात एखाद्या मोठ्या व्यक्तीचा हस्तक्षेप आहे. शिंदे साहेबांनी आहुजाला वाचवण्यासाठी कोणती तरी महत्त्वाची भूमिका बजावली? असं विजय कुंभार यांनी म्हटलं आहे. मी आधीच भाकीत केलं होतं, गौरव आहुजा पोलिसांना तोपर्यंत शरण जाणार नाही जोपर्यंत त्याच्या शरीरातील अल्कोहोलचे प्रमाण पूर्णतः नाहीसे होत नाही आणि नेमकं तसंच झालं. हा एक स्पष्ट कायदेशीर डाव होता आणि गौरव आहुजाने तो अत्यंत व्यवस्थित रचला आणि पारही पडला, असं कुंभार म्हणाले.

Video : पुण्यात भररस्त्यात अश्लील कृत्य करणाऱ्या गौरव आहुजाचा माज उतरला, हात जोडून म्हणाला माफ करा

भररस्त्यात BMW गाडी उभी करून, मद्यधुंद अवस्थेत गौरव आहुजा गाडीतून उतरतो, सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करतो, स्थानिकांनी विरोध केला असता अश्लील इशारे करतो आणि नंतर भरधाव गाडीने पळ काढतो. त्याच्या सोबत त्याचा मित्र भाग्यश ओसवाल देखील होता, जो कारमध्ये दारूची बाटली घेऊन बसला होता.यानंतर FIR नोंदवला गेला पण आश्चर्य म्हणजे गौरव आहुजा अचानक गायब झाला. गौरव आहुजाची माफी आणि त्याने उल्लेख केलेला “शिंदे साहेब” याचा नेमका संबंध काय? गौरव आहुजाला नेमकी कोणत्या शिंदे साहेबांची माफी मागण्याची गरज भासली?

आता सर्वात मोठा प्रश्न आहे की शिंदे साहेब नेमका कोण आहेत? का गौरव आहुजाने माफीनाम्यात शिंदे साहेबांचं नाव घेतले?, शिंदे साहेब आणि गौरव आहुजामधील नक्की काय संबंध आहे ते बाहेर आलं पाहिजे. आम्हाला उत्तरं हवी आहेत, शिंदे साहेब नेमके कोण? आणि त्यांनी गौरव आहुजाला का वाचवलं? असंही कुंभारांनी म्हटलं आहे.

follow us