Download App

अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजाचा येरवडातील मुक्काम वाढला; जामिनावर 20 मार्चला सुनावणी होणार

Gaurav Ahuja या मुलाचा जेलमधील मुक्काम आणखी वाढणार आहे. कारण त्याच्या न्यायालयाने जमीन अर्जावरील सुनावणी 20 तारखेला होईल असं सांगितलं आहे.

Gaurav Ahuja stay in Yerwada extended Hearing bail on 20 March : विद्येचे माहेर घर आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यात एका श्रीमंत बापाच्या पोरानं भररस्त्यात लघुशंका करत अश्लील कृत्य केल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर आता या मुलाला अगोदर एक दिवसाची पोलीस कोठडी तर आता त्याला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र आता या मुलाचा जेलमधील मुक्काम आणखी वाढणार आहे. कारण त्याच्या न्यायालयाने जामीन अर्जावरील सुनावणी 20 तारखेला होईल असं सांगितलं आहे.

‘मालकाच्या पोरीसोबत प्रेमसंबंध, आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं अन् …’, बीडमधल्या ट्रक ड्रायव्हरच्या हत्येची इनसाईड स्टोरी

आज गौरव अहुजाच्या जामीन अर्जावर न्यायालयात आज सुनावणी होणार होती. यावेळी न्यायालयाने जामीन अर्जावरील सुनावणी 20 तारखेला होईल असं सांगितलं. त्यामुळे गौरव आहुजा आणखी तीन दिवस येरवडा जेलमध्ये असणार आहे. त्याच्या जमीनावर सुनावणी 20 तारखेला होणार आहे. तर त्याचा मित्र भाग्येश ओसवाल आज जामीन मिळण्याची शक्यता असल्याच देखील बोललं जात आहे.

नेमकं काय घडलं?

शास्त्री नगर भागात घडलेली घटना शनिवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली असून, व्हायरल व्हिडिओतील मुलाची ओळख पटली असून त्याचे नाव गौरव अहुजा असे आहे. गौरव आणि त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. घटनेवेळी मद्यधुंद असलेल्या चालकाला लघुशंका करताना नागरिकांनी अडवले. त्यानंतर सबंधित युवकाने गाडीत बसल्यानंतर अडवणाऱ्या व्यक्तीला अश्लील हावभाव केले आणि भरधाव वेगात गाडी पुढे नेली. सदर चालक आणि त्याचा मित्र दोघेही बीएमडब्ल्यू गाडीतून वाघोलीच्या दिशेने वेगवान गतीने गाडी जात होते असे जाधव म्हणाले. स्थानिकांनी या घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग पोलिसांना सादर केले आहे, ज्यामुळे चौकशी सुलभ होण्याची शक्यता आहे.

follow us