Good Luck Cafe again In trouble Cockroach in eggshell After Glass in Bun Maska in Pune : गेल्या काही दिवसांपुर्वी पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील प्रसिद्ध गुडलक कॅफेमध्ये (Good Luck Cafe ) बन मस्कामध्ये काच आढळल्याने हा कॅफे अडचणीत सापडला होता. त्यानंतर आता गुडलक कॅफेवर पुन्हा एकदा गंभीर आरोप लागले आहेत. मुंबई-पुणे महामार्गावरील फूड प्लाझामध्ये असलेल्या या कॅफेमध्ये अंडाभुर्जीच्या ताटात झुरळ आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यावरून सोशल मीडियावर देखील संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
नराधमांची क्रूरता! महादेव मुंडेंच्या शरीरावर 16 वार, गळा २० सेमी खोल कापला, श्वसननलिका फाडली…
दरम्यान, काही दिवसांपूर्वी फर्ग्युसन रस्त्यावरील गुडलक कॅफेमध्ये (Good Luck Cafe ) बन मस्कामध्ये काच आढळून आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. याची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने संबंधित शाखेचा परवाना तात्पुरता रद्द केला होता. तर स्वच्छतेसंदर्भात काही त्रुटी दूर करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र हे प्रकरण सुरू असतानाच आता पुन्हा एकदा दुसऱ्या शाखेत असाच प्रकार घडला असल्याने खळबळ उडाली आहे.
एसटीने चालकांचा विचार करावा; आर्थिक व शारीरिक त्रास टाळण्यासाठी फेर मार्ग सर्व्हेक्षणाची मागणी
दोन वेगवेगळ्या शाखांमध्ये सलग अशा घटना घडल्यामुळे अन्न सुरक्षेबाबत गुडलक कॅफेची (Good Luck Cafe ) गंभीर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप तज्ज्ञांकडून करण्यात येत असून घटनेनंतर फूड प्लाझामधील शाखेचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे. दरम्यान, गुडलक कॅफेच्या व्यवस्थापनाकडून या प्रकरणावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
घाण पाणी साचलेले, बुरशी लागलेले अन्नपदार्थ, एफडीआयचा झेप्टोला दणका!
मुंबईतील क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म झेप्टोची (Zepto’s) मूळ कंपनी किरणकार्ट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडवर अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकत मोठी कारवाई केली होती. घाण साचलेल्या पाण्याजवळ अन्न पदार्थ ठेवलेले होते. थेट जमिनीवर अन्न पदार्थ ठेवलेले होते. ती जागी आली होती फरशीची स्वच्छता करण्यात आलेली नव्हती. थेट जमिनीवर ठेवलेले अन्नपदार्थ खराब झालेले आढळून आले होते. त्यानंतर एफडीएने अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 आणि अन्न सुरक्षा आणि मानके (अन्न व्यवसायांचे परवाना आणि नोंदणी) नियम 2011 चे उल्लंघन केल्याप्रकरणी कंपनीचा अन्न परवाना रद्द केला होता. नमूद केले. सहाय्यक आयुक्त (अन्न) श्रीमती अनुपमा बाळासाहेब पाटील यांच्या स्वाक्षरी असलेल्या कायदा आणि नियमन २.१.८(४) च्या कलम ३२(३) अंतर्गत तात्काळ निलंबन आदेश जारी करण्यात आला होता.