Gopichand Padalkar on Sharad Pawar Family at Pune March for Sangali Rutuja Patil Murder : नेहमीच आपल्या सडेतोड तसेच नेहमीच शरद पवार आणि पवार कुटुंबावर टीका करत असणारे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात नाव न घेता पवार कुटुंबाबाबत टीपण्णी केली आहे. सांगलीतील ऋतुजा पाटील हत्येप्रकरणी हिंदुत्त्ववाद्यांच्या पुण्यात काढण्यात आलेल्या मोर्चाच्यावेळी पडळकर बोलत होते.
काय म्हणाले गोपीचंद पडळकर?
हिंदू प्रथा परंपरा पाळणाऱ्या मुलीचं धर्मांतर केलेल्या घरात लग्न लावून देणे ही फसवणूक आहे. त्यामुळे अशा पाद्रींना मारायला हवं. तसेच या सांगलीतील विवाहितेची आत्महत्या नसून कुटुंबियांनी केलेली ही हत्या आहे. तसेच हे कुटुंब या मुलीला ती हिंदू परंपरा पळत असल्याने मुद्दाम तिच्या व्रतांच्या, उपवासांच्या दिवशी घरात मांसाहार करत होते. तिचा मानसिक छळ करत होते. तसेच ती हिंदू असल्याने गरोदर असलेल्या या मुलीचं डोहाळे जेवण करायच होतं. पण ख्रिश्चन कुटुंबाने तिला त्यांचे संस्कार पाळायला भाग पाडलं.
तसेच मी या प्रकरणात आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर या समाजाकडून जे आंदोलन केले गेले. त्यामध्ये एका गटातील एक कुटुंब पुढे होतं. ते घर देखील एकादशीच्या दिवशी मटन खातं. मटन खावून दगडूशेट गणपतीला जातात. ते घरं तुम्हाला माहिती आहे. कारण त्या कुटुंबामध्ये देखील सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, वडिल मराठा आणि आई दुसरीच अशी स्थिती आहे. असं ते कॉकटेल घर आहे. ते आता माझी आमदारकी जावी अशी मागणी करत आहेत. असं म्हणत पडळकरांनी पवारांचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.