Download App

H3N2 Virus : राज्यात H3N2 विषाणूचा स्फोट, 352 रुग्ण आढळले, आरोग्यमंत्र्यांची माहिती

पुणे : कोरोनाच्या विविध सब व्हेरिएंटने राज्यासह देशभरात हाहाकार माजवल्यानंतर आता राज्यासह देशात H3N2 या नव्या विषाणूनं डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. भारतात आतापर्यंत यामुळे चौघांचा मृत्यू झाला आहे. यातील एक मृत्यू राज्यातील नगरमधील आहे. नव्या विषाणुच्या वाढत्या रूग्णसंख्येने प्रशासनासह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, वाढत्या रूग्णसंख्येत राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी महत्त्वाचं विधान केले आहे. ते म्हणाले की, H3N2 विषाणूचे आतापर्यंत 352 रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून रुग्णालयांना सतर्क राहण्यास सांगण्यत आले आहे. H3N2 प्राणघातक नाही, वैद्यकीय उपचाराने बरा होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची गरज नसल्याचे तानाजी सावंत यांनी म्हटले आहे.

H3N2 व्हायरसचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारने H3N2 व्हायरस संदर्भात महत्त्वाची बैठक घेतली. राज्यांचा सूचना करण्यात आल्या आहेत. या बैठकीत आरोग्यमंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. तसेच महाराष्ट्रातही याचे रुग्ण वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. महाराष्ट्रातील वैद्यकीय यंत्रणांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली.

Double Marriage Case : न्यायालयाबाहेरच निघाला तोडगा! नवऱ्याची केली वाटणी… ३-३ दिवस दोघींबरोबर राहणार!

शहरात सध्या व्हायरलची म्हणजेच H3N2 या व्हायरसची साथ आहे, रुग्णांची संख्या वाढली आहे. रुग्णांनी मास्क वापरावा, वेळोवेळी हात धुवावेत, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, साधा आहार घ्यावा, ५ दिवस आराम करावा, घरात इतर व्यक्तींच्या संपर्कात येऊ नये, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा, कोरोना काळात ज्या प्रकारे काळजी घेतली, त्या प्रकारे रुग्णांनी काळजी घ्यावी, असं आवाहन डॉक्टरांकडून केलं जात आहे.

कोरोनापासून सुटका झाली असली तरीही आता H3N2 या नवीन व्हायरसने सर्वांची चिंता वाढवली. विशेष म्हणजे हा व्हायरस झापाट्याने पसरत असून लोकांमध्ये दहशत दिसून येत आहे. तर H3N2 या व्हायरसमुळे देशात दोघांचा बळी गेलाय. त्यामुळे केंद्र सरकार सतर्क झाले असून, सरकारने देशात नवीन नियमावली जाहीर केल्या आहेत. ज्यात गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

Tags

follow us