Double Marriage Case : न्यायालयाबाहेरच निघाला तोडगा! नवऱ्याची केली वाटणी… ३-३ दिवस दोघींबरोबर राहणार!

Double Marriage Case : न्यायालयाबाहेरच निघाला तोडगा! नवऱ्याची केली वाटणी… ३-३ दिवस दोघींबरोबर राहणार!

ग्वाल्हेर : ‘दोन बायका आणि फजिती ऐका’, या म्हणीचा प्रत्यय नुकताच मध्य प्रदेश येथे पाहायला मिळाला आहे. मध्य प्रदेशातील कौटुंबिक न्यायालयाबाहेरच तोडगा निघाला असून थेट नवऱ्याचीच वाटणी करण्यात आली आहे. आठवड्यातून ३-३ दिवस पती दोघींसोबत राहणार आहे. तर रविवारी आपल्या मर्जीनुसार राहण्याची या पतीला मुभा देण्यात आली आहे.

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील ही घटना आहे. एका २८ वर्षीय महिलेला आपल्या पतीने दुसरे लग्न केल्याची खबर मिळाली. त्यामुळे तिने तात्काळ कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली. स्वत:बरोबर मुलाच्या उदरनिर्वाहासाठी खटला दाखल केला. परंतु, न्यायालयाबाहेर त्यावेळी समुपदेशकाने तिला समजावून सांगत या पती-पत्नी दोघांचेही समुपदेशन केला. तसेच न्यायालयाबाहेरच दोघांमध्ये समेट घडवला.

अगदी एखाद्या चित्रपटांमधील कथेप्रमाणे हा प्रकार ग्वाल्हेर येथे घडला आहे. एका संघनक अभियंत्याने एक लग्न झालेले असतानाही पहिल्या बायकोला न सांगता दुसरे लग्न केले. त्यामुळे पहिल्या बायकोने स्वतःच्या उदरनिर्वाहाबरोबरच आपल्या मुलासाठी तिने कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली. मात्र, तिथे न्यायालयाबाहेर एका समुपदेशकाने पती-पत्नीमध्ये अनोखा समेट घडवला. पतीने दोन्हीही पत्नीना एक-एक फ्लॅट दिला असून एका पत्नीकडे तीन दिवस तर दुसऱ्या पत्नीकडे तीन दिवस तो राहणार आहे. तर रविवारी एक दिवस तो स्वतःच्या मर्जीनुसार राहणार आहे.

Asim Sarode म्हणातात… अपात्र आमदारांचा मुद्दा पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडे जाण्याची चिन्हे..!

ग्वाल्हेर येथील महिलेचे २०१८ मध्ये लग्न झाले होते. तिचा पती हरियाणा येथील गुरुग्राम येथे एका बहुराष्ट्रीय कंपनीत संघणक अभियंता आहे. लग्नानंतर दोनच वर्षे एकत्र राहिले. या दोघांना एक मुलगा देखील आहे. परंतु, २०२० मध्ये कोरोना लॉकडाऊनमुळे पतीने पत्नीला मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे आणून सोडले. मात्र, परत न्यायला आलाच नाही. दरम्यान, पतीचे त्या कंपनीतील महिला कर्मचाऱ्याशी सूत जुळले. आधी ते एकत्र राहु लागले नंतर त्यांनी लग्न केले. दुसऱ्या पत्नीपासून त्याला एक मुलगी झाली आहे.

दरम्यान, पती आपल्याला न्यायला येत नाही म्हणून पहिल्या पत्नीने थेट गुरुग्राम गाठले. तेव्हा आपल्या पतीने दुसरे लग्न केल्याचे समजले. त्यावेळी दोघांमध्ये वादावादी झाली. त्यामुळे चिडलेल्या पत्नीने थेट कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली. परंतु, तेथे न्यायालयाबाहेर पत्नीने समुपदेशक हरीश दिवाण यांची भेट घेतली. तेव्हा समुपदेशक हरीश दिवाण यांनी या महिलेला आणि तिच्या मुलाच्या उदरनिर्वाहासाठी फक्त ७ ते ८ हजार रुपयेच पोटगी मिळेल तसेच यातून काहीच फायदा होणार नाही. तिला आणि तिच्या पतीला फोनवरून चर्चा करत त्यालाही समजावून सांगितले. सहा महिन्यांत पाच वेळा हरीश दिवाण यांनी समुपदेशन केले. त्यात तोडगा निघाला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube