Download App

हगवणे मायलेकांच्या अडचणीत वाढ! ‘त्या’ प्रकरणात शशांक आणि लता हगवणेला तीन दिवसांची पोलीस कोठडी

Hagavane मायलेकाला आता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र ही कोठडी एका दुसऱ्याच प्रकरणामध्ये सुनावण्यात आली आहे.

Hagavane’s troubles increase Shashank and Lata Hagavane remanded in three-day police custody :पुण्यातील (Pune News) वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आलाय. आता या प्रकरणाला एक नवीन दिशा मिळणार असल्याचं दिसतंय. या प्रकरणात अटकेत असलेल्या वैष्णवीचा पती शशांक हगवणे आणि सासू लता हगवणे या मायलेकाला आता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र ही कोठडी वैष्णवी हगवणे प्रकरणामध्येनाही तर एका दुसऱ्याच प्रकरणामध्ये सुनावण्यात आली आहे.

‘त्या’ प्रकरणात शशांक आणि लता हगवणेला तीन दिवसांची पोलीस कोठडी

जेसीबी व्यवहारात फसवणूक केल्या प्रकरणी हगवणे मायलेकांना राजगुरुनगर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या व्यवहाराची मूळ कागदपत्र या आरोपीकडे आहेत व्यवहार पूर्ण झाल्यानंतर ते देऊ असते वारंवार म्हणत आलेत. त्यामुळे आम्ही ते आत्ताच सादर करू शकत नाही. त्याचा शोध घ्यायचा आहे. असे सरकारी वकिलांनी सांगितलं आहे. तसेच हा जेसीबीचा व्यवहार आपणच केल्याचं हगवणेने कबूल केलं आहे.

काय आहे जेसीबी व्यवहार प्रकरण?

खेड तालुक्यातील निगोजे येथील प्रशांत येळवंडे यांनी लता राजेंद्र हगवणे आणि शशांक हगवणे यांच्याकडून जेसीबी खरेदी प्रकरणात फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांत दिली आहे.प्रशांत येळवंडे यांनी लता हगवणे आणि शशांक हगवणे यांच्याकडून 24 लाखांचा जेसीबी विकत घेतला होता. हा व्यवहार मार्च 2022 मध्ये झाला होता. येळवंडे यांनी पाच लाख रुपये देऊन जेसीबी ताब्यात घेतला होता. या जेसीबीवर बँकेचे कर्ज होते. त्यामुळे कर्जाचे हप्ते भरण्यासठी येळवंडे यांनी दर महिन्याला हगवणे यांनी 50 हजार रुपये देण्याचेही ठरले होते. यानुसार कर्जाचे हप्ते भरण्यासाठी लता हगवणे यांच्या बँक खात्यात 6 लाख 70 हजार रुपये जमा करण्यात आले होते.

मोठी बातमी! बकरी ईदनिमित्त विशाळगडावर कुर्बानी देण्यास परवानगी; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

परंतु, त्यांनी बँकेचे हप्ते न भरता ही रक्कम स्वतःसाठी वापरली. त्यामुळे कर्ज देणाऱ्या बँकेने ऑगस्ट 2024 मध्ये प्रशांत येळवंडे यांच्याकडून जेसीबीचा ताबा घेतला होता. यानंतर हगवणेंनी हा जेसीबी बँकेकडून सोडवून घेतला. पण प्रशांत येळवंडेंना दिला नाही. स्वतःकडेच ठेऊन घेतला. त्यामुळे जेसीबीसाठी दिलेले 11 लाख 70 हजार रुपये परत द्यावेत नाहीतर जेसीबीचा ताबा द्या अशी मागणी येळवंडेंनी केली. वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही पैसे किंवा जेसीबी यातील काहीच मिळालं नाही म्हणून येळवंडे यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिल्याची माहिती मिळाली आहे.

follow us