मोठी बातमी! बकरी ईदनिमित्त विशाळगडावर कुर्बानी देण्यास परवानगी; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

मोठी बातमी! बकरी ईदनिमित्त विशाळगडावर कुर्बानी देण्यास परवानगी; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

Bakri Eid festival at Vishalgad : बकरी ईद निमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर (Vishalgad) कुर्बानी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. येत्या 7 आणि 8 जून रोजी नियम, अटींचं पालन करून कुर्बानी देण्यास परवानगी देण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे विशाळगडवर जाणाऱ्या सर्वच भक्तांना अशी कुर्बानी देता येणार आहे.

गेल्या वर्षी विशाळगडवर झालेल्या वादामुळे अतिक्रमणाचा मुद्दा चर्चेत आला होता. त्या पार्श्वभूमीवर ईदच्या कुर्बानीची परवानगी मिळणार की नाही याबद्दल साशंकता होती. ईदच्या दिवशी विशाळगडवर कुर्बानीची परवानगी मिळावी यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्याला आता परवानगी देण्यात आली आहे.

बकरी ईदचा सण जगभरात बकऱ्याची कुर्बाणी देऊन का साजरा होतो?, कुठल्या-कुठल्या देशात हे घडतं?

गेल्या वर्षी 14 जुलै रोजी विशाळगडवरील अतिक्रमणाच्या मुद्द्यावरुन दंगल घडली होती. त्यानंतर काही काळ या गडावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली. नंतरच्या काळात या ठिकाणी कुर्बानी देण्यावरही नियंत्रण आलं. गेल्या वर्षी विशाळगडवर जो उरुस झाला त्यावेळी फक्त स्थानिकांनाच कुर्बानी देण्याची परवानगी देण्यात आली होती.

या वर्षीच्या ईदच्या निमित्ताने विशाळगडावर कुर्बानीची परवानगी देण्यात यावी अशी मागणी हायकोर्टाकडे करण्यात आली होती. त्यावर हायकोर्टाने ही परवानगी दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे फक्त स्थानिकांनाच नव्हे तर ईदनिमित्त विशाळगडवर येणाऱ्या भाविकांनाही कु्र्बानी देण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मिरा रोडमध्ये हायप्रोफाईल सोसायटीत बकरीच्या कुर्बानीवरुन वाद निर्माण झाला आहे. कुर्बानीसाठी बकरी आणली असता काही रहिवाशांनी त्याला विरोध केल्यानं वाद निर्माण झाला. गेल्या वर्षीही मिरा रोडमधील काही सोसायट्यांमध्ये बकरीची कुर्बानी देण्यास विरोध झाला होता. तसंच, हिंदू सण पर्यावरणपूरक साजरे करा असा सल्ला देणारे बकरी ईद व्हर्च्युअली का साजरी करत नाहीत असा प्रश्न विचारत राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी बकरी ईदच्या कुर्बानीला विरोध केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube