विशाळगडावरील हिंसाचार हा प्रशासनाच्या पाठबळाने झालेला गुन्हा…; नाना पटोलेंचे टीकास्त्र
Nana Patole : विशाळगडावरीलअतिक्रमण (Vishalgad) हटवण्यासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला रविवारी हिंसक स्वरुप प्राप्त झालं. हिंदू संघटनांनी दगडफेक, जाळपोळ करून घरांचे आणि वाहनांचे नुकसान केले. दरम्यान, यावर आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) भाष्य केलं. विशाळगडावर झालेला प्रकार हा प्रशासनाच्या पाठबळाने झालेला गुन्हा आहे, अशी टीका पटोलेंनी केली.
IAS पूजा खेडकरांच्या वडिलांकडे बेहिशोबी मालमत्ता; प्राथमिक चौकशीनंतर दिलीप खेडकरांचा पाय खोलात
नाना पटोले यांनी विशाळगड प्रकरणाबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्यात पटोले म्हणाले, विशाळगडावरील अतिक्रमणाच्या नावाखाली गजापूर गावात एकाच धर्माच्या लोकांवर हल्ले करून त्यांची घरे, दुकाने आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले. हा झुंडशाहीचा प्रकार महाराष्ट्राला शोभणारा नाही. या दंगेखोरांच्या तात्काळ मुसक्या आवळा व कठोर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली.
हिंदू-मुस्लीम तेढ निर्माण करण्याचा जाणिपूर्वक प्रयत्न
पटोलेंनी पुढे लिहिले की, महाराष्ट्र ही साधू संतांची, थोर पुरूषांची, विचारवंत आणि समाजसुधारकांची भूमी आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर चालणारे पुरोागामी राज्य अशी महाराष्ट्राची ओळख आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून आपल्या राजकीय फायद्यासाठी सत्ताधारी पक्षातील काही नेते प्रक्षोक वक्तव्ये करून राज्यात हिंदू-मुस्लीम तेढ निर्माण करण्याचा जाणिपूर्वक प्रयत्न करत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करण्याचा हा प्रकार अत्यंत घातक व महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंक लावणार आहे, असं पटोलेंनी लिहिलं.
‘भाजपचा पराभव अजितदादांमुळेच’; RSS च्या मुखपत्रानंतर आता ‘विवेक’मधूनही टीकास्त्र
विशाळगडावरील अतिक्रमणे काढली पाहिजेत, याबाबत कोणाच्याही मनात दुमत नाही. आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा गड किल्यांचा वारसा जपला पाहिजे. अतिक्रमणाचे हे प्रकरण न्यायालयात गेलेले आहे, न्यायालयात सुनावणी सुरू असताना सरकारी वकील हजर राहत नाहीत, सरकारी पक्षाकडूनच वेळकाढूपणा केला जात असतांना अचानक अशा काही हालचाली करून अतिक्रमणाचा मुद्दा चव्हाट्यावर आणला गेला. 14 तारखेला विशालगडावरील अतिक्रमणाच्या नावाखाली विशाळगडापासून 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या गजापूर गावात एका धर्माच्या लोकांच्या घरांवर हल्ला करून त्यांना मारहाण करण्यात आली. हा प्रकार मानवतेला काळिमा फासणारा आहे. विशालळडावरील अतिक्रमण आणि गजापूर गावातील दंगल हे दोन वेगळे मुद्दे असल्याचे पटोले यांनी या पत्रात म्हटले आहे.
https://www.youtube.com/watch?v=p4Timaq8CU
या प्रकरणी गृहमंत्री फडणवीस यांनी केलेलं विधान हे राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी किंवा दंगलखोरांवर कारवाई करण्यासंदर्भातील नसून एका विशिष्ट धर्माला भिती घालण्याचे व या प्रकाराला वेगळा रंग देणारे आहे. हे गृहमंत्र्यांचे विधान दंगलखोरांना पाठीशी घालणारे आहे. आम्ही या वक्तव्याचाही निषेध करतो. 14 जुलै रोजी झालेला हिंसाचार हे केवळ सरकार आणि प्रशासनाचे अपयश नसून प्रशासनाच्या पाठबळाने झालेला गुन्हा आहे, अशी टीका पटोलेंनी पत्रातून केली.