हेच राहिलं होतं; घर, गाडीनंतर आता आंब्यासाठी EMI

Hapus Mango On EMI at Pune :  उन्हाळा आणि आंबा हे समीकरण सातत्याने आपल्याकडे चालू आहे. उन्हाळ्यामध्ये आंबा खाणे हा सर्व लोकांसाठी खास आनंद देणारा क्षण असतो. एक तर उन्हाळ्यामध्ये मुलांना शाळेची सुट्टी असते. त्यामुळे आपल्या कुटूंबासोबत आंब्याचा आस्वाद घेणे ही एक विशेष बाब असते. त्यातही आपल्याकडे आंब्याचे असंख्य प्रकार आहेत. अगदी हापूसपासून तर केशर, […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 05T153308.735

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 04 05T153308.735

Hapus Mango On EMI at Pune :  उन्हाळा आणि आंबा हे समीकरण सातत्याने आपल्याकडे चालू आहे. उन्हाळ्यामध्ये आंबा खाणे हा सर्व लोकांसाठी खास आनंद देणारा क्षण असतो. एक तर उन्हाळ्यामध्ये मुलांना शाळेची सुट्टी असते. त्यामुळे आपल्या कुटूंबासोबत आंब्याचा आस्वाद घेणे ही एक विशेष बाब असते. त्यातही आपल्याकडे आंब्याचे असंख्य प्रकार आहेत. अगदी हापूसपासून तर केशर, तोतापूरी, लंगडा या अशा असंख्य प्रकारच्या आंब्याचे प्रकार आपल्याकडे पहायला मिळतात.

आंबा हा एकमेव असा पदार्थ असेल की ज्यापासून अनेक पदार्थ तयार केले जातात. त्यामध्ये आंबा बर्फी, आंब पोळी, आमरस तसेच आंब्याच्या फ्लेवरचे कोल्ड्रिंक्स असे विविध पदार्थ तयार केले जातात. त्यामुळे आंबा हे फळ आपल्याकडे विशेष लोकप्रिय असून म्हणूनच त्याला फळांचा राजा असे म्हटले जाते. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात आपल्याकडे लोक मोठ्या प्रमाणावर आंबे खातात.

करिअर विषयक साहित्य, अभ्यासिका व वेबसाईट विकास योजना

पण गेल्या काही वर्षापासून हापूस आंब्याचा दर सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. त्यातच गेल्या दोन वर्षातील कोरोनामुळे अनेक नागरिकांची आर्थिक परिस्थिती ही ढासळलेली आहे. या परिस्थितीचा विचार करुन पुण्यातील एका आंबा व्यावसायिकाने अनोखी शक्कल लढवली आहे. त्याने चक्क ईएमआयवर आंबा विकायला सुरुवात केली आहे.

आत्तापर्यंत आपण टीव्ही, फ्रीज सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू या ईएमआयवर विकत मिळताना पाहिले होते. पण यावेळेस मात्र या दुकानदाराने अनोखी युक्ती लावत ईएमआयवर आंबा विकायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक नागरिक या स्किमचा लाभ घेत आहेत. आत्तापर्यंत दोन ग्राहकांनी ईएमआयवर आंबा विकत घेतला आहे.

‘बलोच’मध्ये दिसणार मराठ्यांची शौर्यगाथा, प्रवीण तरडेंच्या मोशन पोस्टरने वेधले लक्ष

पुण्याच्या सिंहगड रोड परिसरात या आंबा व्यावसायिकाने ईएमआयवर आंबा विकायला सुरुवात केली आहे. गौरव सणस असे त्यांचे नाव असून त्यांचे चॉकलेट आणि फटाके विक्रीचे दुकान आहे. यंदाच्या वर्षापासून त्यांनी दुकानांमध्ये आंबे विक्री चा व्यवसाय हा सुरू केला आणि तोही ग्राहकांना ईएमआय मध्ये आंबे खरेदी करण्याची सुवर्णसंधी मिळवून दिली.

त्यांच्याकडे साधारणपणे सहाशे ते तेराशे रुपये डझनचे आंबे विक्रीस उपलब्ध आहेत . ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांना त्यांच्या पसंतीचे आंबे एमआय वरती खरेदी करता येतात. पुण्यातील सन सिटी रोडवर आनंद नगर परिसरामध्ये हे दुकान आहे.

Exit mobile version