Download App

Hemant Rasne : हरलो, पण खचलेलो नाही, लढण्याची जिद्द…

पुणे : कसबा पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवाने हरलो पण खचलो नाही. या पराभवाचा मी आणि पक्षाने आत्मपरीक्षण केले आहे. त्यामुळे ज्या चुका झाल्या आहेत. त्या दुरुस्त करून पुन्हा लढण्याची जिद्द निर्माण झाली आहे. कसबा पोटनिवडणुकीत आम्ही नियोजन चांगले केले होते. प्रत्यक्षात आम्हाला कमी मतदान झाले. त्यामुळे भाजपचा कसब्यातील उमेदवार चुकला असे म्हणता येणार नाही. कारण माझं याठिकाणचे काम आणि ताकद पाहुनच पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ज्या दिवशी पराभव झाला त्यादिवशी मी नैतिक जबाबदारी स्वीकारली आहे, असे स्पष्टीकरण कसब्यातील भाजपचे पराभूत उमेदवार हेमंत रासने यांनी दिले.

मी वयाच्या १४ व्या वर्षांपासून राजकारण, समाजकारणात आहे. माझें या भागातील काम आणि ताकद पाहुनच पक्षाने मला कसबा मतदार संघात पोटनिवडणुकीत संधी दिली आहे, असा खुलासा भाजपचे कसब्यातील पराभूत उमेदवार हेमंत रासने यांनी केला.

आधी भाकरी-चाकरीवरुन खडाजंगी अन् मग आदित्य ठाकरेंच्या लग्नावरुन हास्यकल्लोळ

हेमंत रासने म्हणाले की, मागच्या निवडणुकीत शिवसेना आमच्या बरोबर होती. या पोटनिवडणुकीत ते नसल्याने त्यामुळे त्याचा काही अंशी फटका बसला आहे. तसेच माझ्या प्रभागातून काही अंशी फटका बसला आहे. या प्रभागात आम्हाला मागील निवडणुकीत ४१ हजार मते मिळाली होती. तर आता च्या पोटनिवडणुकीत ३७ हजारच मतदान झाले आहे. त्यामुळे आमचे लीड कमी झाल्याने त्याचा मोठा फटका मला बसला आहे.

Tags

follow us