Download App

हिंदू गर्जना चषक : कोल्हापुरच्या शुभम शिदनाळे, अपेक्षा पाटील, हवेलीच्या सुरज चोरघे यांना विजेतेपद

Hindu Garjana Chashak: शुभम याने उपांत्य फेरीमध्ये गतवेळचा महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याचा 6-2 अशा गुणफरकाने पराभव केला.

  • Written By: Last Updated:

Hindu Garjana Chashak: Kolhapur’s Shubham Shidanale, apeksha Patil, Haveli Suraj Chorghe win titles पुणे : हिंदू गर्जना प्रतिष्ठान आणि पुनित बालन ग्रुप (Punit Balan Group) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हिंदू गर्जना चषक (Hindu Garjana Chashak) महिला व पुरूष राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत खुल्या गटामध्ये कोल्हापुरच्या शुभम शिदनाळे याने तर, कुमार गटामध्ये हवेली सुरज चोरघे तसेच महिला गटामध्ये कोल्हापुरच्या अपेक्षा पाटील यांनी विजेतेपद संपादन करून मानाची चांदीची गदा पटकावली.

टिळक रोड येथील स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर तयार करण्यात आलेल्या स्व. धनंजय रामचंद्र घाटे क्रीडानगरीमध्ये झालेल्या स्पर्धेच्या खुल्या गटाच्या अंतिम फेरीमध्ये शुभम याने उपांत्य फेरीमध्ये गतवेळचा महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याचा 6-2 अशा गुणफरकाने पराभव करून मुळशीच्या तानाजी झुंझुरगे समोर आपले आव्हान निर्माण केले होते. अंतिम सामना हा निकाली कुस्ती घेण्यात येणार असल्याने दोन्ही कुस्तीपटूंनी सुमारे तासभर जोरदार खेळ करून उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर सहा मिनिटांची गुणांची लढत खेळण्याचा निर्णय पंचांनी घेतला. तासभर दमल्यानंतर लढल्या गेलेल्या कुस्तीमध्ये शुभमने आपल्या आडदांड शरीरयष्टीच्या जोरावर तानाजीचा 10-1 अशा गुणफरकाने सहज पराभव करून विजेतेपदावर आपले नाव कोरले.

आई-वडिलांबद्दल वल्गर प्रश्न; टीकेची झोड उठल्यावर रणवीर अलाहाबादियाने मागितली माफी

17 वर्षांखालील कुमार खुला गटामध्ये हवेलीच्या सुरज चोरघे याने आपलाच संघ सहकारी आणि तालिमीतील दोस्त रोहीत दिघे याचा 13-2 असा सहज पराभव केला. विजयानंतर रोहीत याने वेदांत याला आपल्या स्वतःच्या खांद्यावर घेऊन स्टेडियमला विजयी प्रदक्षिणा घातली, तेव्हा उपस्थित क्रीडाप्रेमींनी रोहीत आणि वेदांत याच्या खिलाडूवृत्तीचे कौतुक केले. महिलांच्या खुल्या गटामध्ये कोल्हापुरच्या अपेक्षा पाटील हिने पिंपरी-चिंचवडच्या प्रगती गायकवाड हिचा ३-२ असा निसटता पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली आहे.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र राज्य नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ राज्यमंत्री माधुरी सतीश मिसाळ, आमदार योगेश टिळेकर, सिनेअभिनेता अंकुश चौधरी, माणिकचंद ऑक्सिरीचच्या कार्यकारी संचालिका जानव्ही धारीवाल-बालन, स्पर्धेचे आयोजक पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन आणि हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष धीरज रामचंद्र घाटे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पुणे शहराचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने, तसेच हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आदी उपस्थित होते.

खुल्या गटातील विजेता शुभम शिदनाळे याला चांदीची गदा, 2 लाख 51 हजार रुपये, महिंद्रा थार मोटारकार आणि स्मृतीचिन्ह तर, उपविजेत्या तानाजी झुंझुरगे याला 1 लाख 51 हजार रुपये आणि स्मृतीचिन्ह तसेच तृतीय क्रमांकाच्या विजेत्या सोलापुरच्या प्रमोद सुळ याला 1 लाख 51 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. खुल्या गटातील महिला विजेता ठरलेल्या कोल्हापुरच्या अपेक्षा पाटील हिला 2 लाख 51 हजार रुपये, ई-बाईक आणि चांदीची गदा, उपविजेता ठरलेल्या प्रगती गायकवाड आणि तृतीय क्रमांच्या वेदीका सासणे यांना 1 लाख आणि 51 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. कुमार गटातील विजेत्या सुरज चोरघे याला चांदीची गदा आणि 1 लाख रुपयांचे पारितोषिक, तसेच 17 आणि 14 वर्षाखालील गटातील विजेत्यांना सायकल आणि 25 हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले.

स्पर्धेचा सविस्तर निकालः अंतिम निकालः (प्रथम, व्दितीय, तृतीय या क्रमानुसार)ः
१७ वर्षाखालील कुमार खुला गटः सुरज चोरघे (हवेली); रोहीत दिघे (हवेली); वेदांत झुंझुरके (मुळशी);

महिला गटः
53 किलोः ज्ञानेश्वरी पायगुडे (पुणे); सुहानी चोरघे (इंदापूर); दिशा पवार (पुणे जि.);
57 किलोः अहिल्या शिंदे (इंदापूर); वैष्णवी तोरवे (पुणे जि.); सिद्धी ढमढेरे (पुणे जि.);
62 किलोः आकांक्षा जाधव (पुणे); अनुष्का भालेकर (पिंपरी-चिंचवड); ऋतुजा गाढवे (पुणे जि.);
65 किलोः रोशनी बोडखे (इंदापूर); विशाखा चव्हाण (पुण जि.); सावनी सातकर (मावळ);
खुला गटः अपेक्षा पाटील (कोल्हापुर); प्रगती गायकवाड (पिंपरी-चिंचवड); वेदीका सासणे (कोल्हापुर);

वरिष्ठ विभागः
57 किलोः विशाल शिळीमकर (भोर); मिलींद हरनावळ (इंदापूर); यश बुदगुदे (भोर);
61 किलोः ओमकार निगडे (भोर); अभिषेक लिमण (वेल्हा); अमोल वालगुडे (वेल्हा);
65 किलोः भालचंद्र कुंभार (हवेली); संग्राम जगताप (पुरंदर); श्रीकृष्ण राऊत (पुणे शहर);
70 किलोः सुरज कोकाटे (इंदापूर); निखील वाडेकर (खेड); शुभम जाधव (दौंड);
74 किलोः अनिल कचरे (इंदापूर); करण फुलमाळी (पुणे श.); निखील कदम (पुणे श.);
79किलोः मयुर दगडे (इंदापूर); रितेश मुळीक (इंदापूर); आकाश डुबे (दौंड);
86 किलोः शुभम थोरात (पुणे श.); अविनाश गावडे (इंदापूर); अभिषेक गडदे (पुणे श.);
खुला गट 86 ते 125 किलोः शुभम शिदनाळे (कोल्हापुर); तानाजी झुंझुरगे (मुळशी); प्रमोद सुळ (सोलापुर);

follow us