‘पुनित बालन ग्रुप’च्या आरती पाटीलचे दैदिप्यमान यश; पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत दोन कांस्यपदके
Pune News : ‘पुनीत बालन ग्रुप’ पॅरा-बॅडमिंटन खेळाडू आरती पाटील हिने टाटा नगर (झारखंड) येथे झालेल्या सहाव्या ‘राष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२३-२४ स्पर्धेत’ एकेरी आणि महिला दुहेरीत दोन कांस्यपदके पटकावली. कर्नाटकातील पॅरा-बॅडमिंटन खेळाडू आरती पाटीलचा नुकताच ‘पुनीत बालन ग्रुप’शी करार झाला. त्यानुसार आंतरराष्ट्रीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडू आरती पाटीलच्या खेळातील करिअरसाठी ‘पुनीत बालन ग्रुप’कडून सर्वतोपरी मदत केली जात आहे. पाटील ही एक भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडू असून ती सध्या महिला एकेरी SU5 साठी पॅरा-बॅडमिंटन जागतिक क्रमवारीत १० व्या क्रमांकावर आहे.
पोलिसांच्या असामान्य सेवेला पुनित बालन यांचा सलाम : पुणे पोलिस कल्याण निधीला पाच लाखांची देणगी
कर्नाटकातील नंदगड गावात जन्मलेल्या आरतीने २००८ मध्ये धावपटू म्हणून सुरुवात केली. २००९ मध्ये तिने रॅकेट उचलण्याचा निर्णय घेतला आणि तेंव्हापासून बॅडमिंटनपटू म्हणून तिच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. तिने आतापर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पदके जिंकली आहेत. नुकत्याच झारखंडमधील टाटा नगर येथे झालेल्या सहाव्या ‘राष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२३-२४’ या स्पर्धेत तिने एकेरी आणि महिला दुहेरीत दोन कांस्यपदके पटकावत आणखी एक उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या दैदिप्यमान यशाबद्दल क्रीडा क्षेत्रात तिचं सर्वत्र कौतुक होत आहे.
‘‘आरती पाटील ही एक प्रतिभावान आणि होतकरु खेळाडू आहे. सहाव्या ‘राष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत’ तिने हे दाखवून दिलं असून या दैदिप्यमान विजयाबद्दल तिचं मनपूर्वक अभिनंदन. आपल्यातील पूर्ण क्षमता पणाला लावून ती खेळत असते. भविष्यातही ती अशाच प्रकारे यशाची वेगवेगळी शिखरं पार करील, असा विश्वास वाटतो आणि आम्ही तिच्या पाठीशी सदैव उभे राहू असे पुनित बालन ग्रुप अध्यक्ष पुनित बालन यांनी सांगितले.
पुनित बालन ग्रुप ‘फ्रेंडशिप करंडक : साई पॉवर हिटर्स संघाने सलग दुसऱ्या वर्षी पटकावली ट्रॉफी