पोलिसांच्या असामान्य सेवेला पुनित बालन यांचा सलाम : पुणे पोलिस कल्याण निधीला पाच लाखांची देणगी
पुणे : वर्षभर घर, कुटुंब, सण, उत्सव, आजारपण अशा कशाचीही तमा न बळागता आहोरात्र समाजासाठी झटणाऱ्या पोलिसांच्या असामान्य कामगिरीला सलाम म्हणून पुनित बालन ग्रुपतर्फे पुणे पोलिस कल्याण निधीला (Pune Police Welfare Fund) पाच लाख रुपयांची देणगी देण्यात आली आहे. पुनित बालन (Punit Balan) ग्रुप आयोजित पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथक आणि माध्यमे यांंच्या संघांचा ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचा सामान नुकताच पार पडला.
यावेळी पुनित बालन ग्रुपचे संचालक पुनित बालन आणि माणिकचंद ऑक्सिरीचच्या संचालिका जान्हवी धारीवाल-बालन यांच्या हस्ते पाच लाख रूपयांचा धनादेश झोन तीनचे डीसीपी संभाजी कदम यांना देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे अप्पर पोलिस महासंचालक (कारागृह) अमिताभ गुप्ता, सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे, माजी आमदार जगदीश मुळीक, मोहन जोशी उपस्थित होते. (Punit Balan Group has donated five lakh rupees to the Pune Police Welfare Fund.)
चंद्रकांत पाटलांनी छाती ठोकपणे सांगितले, ‘महादेव जानकर कुठेच जाणार नाही…’
पुनित बालन म्हणाले की, पुणे शहराची कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पुणे पोलिस दलाकडे असते. पुण्यामध्ये होणारे गणोशोत्सव आणि नवरौत्सव असे सण निर्विघनपेण पार पडावेत, यासाठीहीसुद्धा पोलिस दल दक्ष असतात. गणेशोत्वामध्ये सलग चोवीस चोवीस आपले कर्तव्य पार पाडतात आणि त्यामुळेच नागरिकांना या सर्व उत्सवाचा आनंद घेता येतो. समाजातील कला आणि क्रीडा क्षेत्रातील विविध नागरिकांना प्रोत्साहन देऊन त्यांना त्यांच्या ध्यैयापर्यंत पोहचण्यासाठी मुख्य आधार देण्याचे काम आमच्या ग्रुप तर्फे करण्यात येते. या हेतूनेच पोलिसांच्या असामान्य कामगिरीला सलाम म्हणून तसेच पोलिसांच्या कुटूंबीयांना मदत मिळावी म्हणून आम्ही निधी सुपूर्त केला आहे.
Pune News : कात्रजच्या प्राणी संग्रहालयातून बिबट्या पसार…
पुणे पोलिस अन् पुनित बालन ग्रुपमध्ये मैत्रिपूर्ण सामना :
‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेच्या निमित्ताने पुणे पोलिस आणि पुनित बालन ग्रुप यांच्यामध्ये मैत्रिपूर्ण सामना आयोजित करण्यात आला होता. या सामन्यात पुणे पोलिस संघाने पुनित बालन ग्रुपवर अखेरच्या षटकामध्ये निसटता विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पुनित बालन ग्रुपने 10 षटकामध्ये पाच गडी गमावून 92 धावांचे आव्हान उभे केले. कुणाल भिलारे (39 धावा), पुनित बालन यांनी नाबाद 15 धावा आणि राहुल साठे याने 23 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. पुणे पोलिस संघाने अखेरच्या षटकामध्ये हे लक्ष्य गाठले. पप्पु तोडकर यांनी 44 धावा आणि किरण गायकवाड यांनी नाबाद 35 धावा करून संघाला विजय मिळवून दिला.