Download App

DRDO Case : कुरूलकरांनंतर एअरफोर्सचा अधिकारी हनी ट्रॅपच्या जाळ्यात?; चौकशीत धक्कादायक खुलासे

DRDO Honey Trap Case : हनीट्रॅप प्रकरणात डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकरांनंतर आता एक अधिकारी अडकल्याची माहिती समोर आली आहे. एअरफोर्सचा एक अधिकारीही हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकला आहे. एटीएसने केलेल्या चौकशीत आणखी धक्कादायक खुलासे होत आहेत. दरम्यान, आज प्रदीप कुरुलकरांना पुण्यातल्या विशेष एटीएस न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर उद्यापर्यंत एटीएस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हनीट्रॅपमध्ये अडकल्यानंतर कुरुलकरांनी पाकिस्तानला संवेदनशीर माहिती पुरवल्याचा आरोप एटीएसकडून ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात चौकशी सुरु असातानाच आता एअरफोर्सचे अधिकारी निखिल शेंडे यांच्याोबतही पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेचा संपर्क झाल्याची माहिती समोर आलीय.

आधी आपला पक्ष सांभाळा, निघाले तिसरी आघाडी करायला; विखे थेट पवारांवर घसरले

या प्रकरणी एअरफोर्सचे अधिकारी निखिल शेंडे यांच नाव समोर आलं आहे. त्यांची चौकशी केल्यानंतर तपासात धक्कादाय माहिती उघड झाली आहे. निखिल शेंडे देखील हनी ट्रॅप प्रकरणात अडकले होते. एअरफोर्सच्या गुप्तचर पथकाकडून निखिल शेंडे यांची चौकशी सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

Madhuri Dixit Love Story : डॉ नेनेंसोबत अशी झाली माधुरीची पहिली भेट, बाईक राईड केल्यावर फुललं प्रेम

या प्रकरणी निखिल शेंडे यांचा वनप्सल कंपनीचा वनप्लस 6T हा काळ्या रंगाचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. हा मोबाईल फॉरेन्सिक लॅबच्या ताब्यात असून मोबाईलची तपासणी सुरु आहे. अधिकाऱ्यांकडून पुराव्यासंबंधी स्क्रिनशॉट काढण्यात आले असून यामध्ये आणखी काही लोकं अडकलेत का? याचा तपास सुरु आहे.


Karnataka Government Formation : काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक संपली; मुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स कायम

दरम्यान, निखिल शेंडेंचा मोबाईल अधिकाऱ्यांकडे असतानाच एका महिलेचा कॉल आला असल्याचं समोर आलंय. तसेच अधिक माहितीसाठी फॉरेन्सिकच्या अधिकाऱ्यांकडून मोबाईल ओपन झाला नसल्याचं समजतंय.

.. म्हणून आम्ही उद्धव ठाकरेंना भाजपाच्या मदतीने धडा शिकवला; शिरसाटांनी सांगितला ‘तो’ किस्सा

प्रदीप कुरुलकरांना एटीएसच्या विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसांची कोठडी सुनावली. यावेळी न्यायालयाच्या निर्णयावर युक्तीवाद करताना एक दिवसाची कोठडीची आवश्यकता नसल्याचा वकीलांकडून करण्यात आला. तसेच कुरुलकरांची सर्वच माहिती एटीएसकडे आधीच आहे.

कुरूलकर यांना पाकिस्तानी एजंट असणाऱ्या महिलेकडून एक मेसेज आला होता. ज्यात तिने आपण लंडनची रहिवासी असल्याचे सांगितले होते. यावेळी या महिलेने कुरूलकर देशासाठी करत असलेल्या कामचे कौतुक केले होते. कालांतराने या दोघांमध्ये बोलणे वाढले.

संबंधित महिलेला क्षेपणास्त्रांची आवड असल्याने आणि याची माहिती आपण तिला दिल्यास ती आपल्यासाठी काहीही करेल असे कुरूलकरांना वाटले. याच उद्देशाने संबंधित अधिकाऱ्याने DRDO ची गुप्त माहिती त्या महिलेलेा पुरवल्याचे सांगितले जात आहे.

एवढेच नव्हे तर, पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्हच्या एजंटने कुरुलकर यांना अडकवण्यासाठी अश्लिल चॅट केले. तसेच कुरूलकर कामानिमित्त रशियाच्या दौऱ्यावर जाणार होते. तेथून ते महिलेले भेटण्यासाठी लंडनला जाणार होते. परंतु काही कारणामुळे त्यांचा रशियाचा दौरा रद्द झाला. ते लंडनला देखील गेले नसल्याची माहिती समोर आलीय.

Tags

follow us