मुंबई-पुणे मिसिंग लिंक पुलावर भीषण अपघात; 4 गाड्या एकमेकांना धडकल्या कारवर चढली फॉर्च्यूनर

Mumbai-Pune Missing Link मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाच्या पुलावर आज सकाळी भीषण साखळी अपघात झाला.

Mumbai Pune Missing Link

Mumbai Pune Missing Link

Horrific accident on Mumbai-Pune ‘Missing Link’ bridge four vehicles collided Fortuner mounted car : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाच्या पुलावर आज सकाळी भीषण साखळी अपघात झाला. या अपघातात चार वाहने एकमेकांवर आदळल्याने काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. अपघाताची तीव्रता इतकी होती की एका एसयूव्ही वाहनाने समोरील कारला जोरदार धडक दिल्यानंतर वाहनं एकमेंकांमध्ये अडकली होती.

‘द महाराष्ट्र फाईल्स’ पाकिस्तानसह सर्व इस्लामिक देश आणि चीनमध्ये प्रदर्शित होणार

प्राथमिक माहितीनुसार, पुलावरील वाहतूक सुरू असतानाच एका वाहनाचा वे ताबा सुटल्याने हा अपघात घडला. धडकेनंतर मागून येणारी इतर वाहनेही एकमेकांवर आदळली. यामध्ये एका फॉर्च्युनर वाहनाने समोरील कारला जोरदार धडक दिल्याने कारचे मोठे नुकसान झाले. अपघातग्रस्त वाहनांचे समोरील आणि बाजूचे भाग चुराडा झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

रामदास आठवलेंना पाडले, आता लोखंडेंचा गेम? भाऊसाहेब वाकचौरे नेहमीच चर्चेत

घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, आपत्कालीन मदत पथक आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना त्वरित सुरक्षितस्थळी हलवून वैद्यकीय मदत पुरविण्यात आली. काहींना किरकोळ दुखापती झाल्याची माहिती असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.अपघातामुळे द्रुतगती मार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी नुकसानग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले. त्यामुळे काही वेळानंतर वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.

शेवगावात समृद्ध पंचायत राज वाद तापला; अधिकाऱ्यांसाठी तालुक्यातील सरपंच एकवटले…

दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वेग, वाहनांमधील अंतर आणि चालकांचे नियंत्रण याबाबत तपास सुरू आहे. मिसिंग लिंक प्रकल्प परिसरात वाहतूक करताना वाहनचालकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. या घटनेमुळे द्रुतगती मार्गावरील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Exit mobile version