बारावीत नापास होणं जिव्हारी लागलं; पिंपरीत विद्यार्थिनीनं संपवलं जीवन

पिंपरी : बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याने विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पिंपरी चिंचवड येथील दापोडी परिसरात काल गुरुवारी (ता. 25) दुपारी घडली आहे. साक्षी राम कांबळे (वय 18, रा. गुलाबनगर, दापोडी. मूळगाव उमरगा), असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती दापोडी येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होती. Ahmednagar : देवेंद्र फडणवीसांच्या […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 26T125227.475

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 05 26T125227.475

पिंपरी : बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याने विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पिंपरी चिंचवड येथील दापोडी परिसरात काल गुरुवारी (ता. 25) दुपारी घडली आहे. साक्षी राम कांबळे (वय 18, रा. गुलाबनगर, दापोडी. मूळगाव उमरगा), असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती दापोडी येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होती.

Ahmednagar : देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्याने विखे पाटील-शिंदेंच्या नात्यात ‘समृद्धी’ येणार?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी तिने कुटुंबासोबत जेवण केले. त्यानंतर बारावीचा निकाल पाहण्यासाठी जाते असे सांगून घराबाहेर पडली. मात्र, दुपारी दोन वाजताच्या सुमारास ती पुन्हा घरी आली. नापास झाल्याचे तिने वडिलांना सांगितले. मात्र, वडिलांनी काही हरकत नाही पुढच्या वर्षी पुन्हा परीक्षा दे, असे सांगितले. पण अपयश हे सहन न झाल्याने साक्षी वरच्या मजल्यावरील आपल्या खोलीत गेली आणि छताच्या लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला.

राऊत-केसरकर जुंपली! पाच जागांच्या टीकेवर केसरकर म्हणाले, संजय राऊत स्वतःच कन्फ्यूज

साधारणतः 15 मिनिटांनंतर तिची आई वरच्या खोली गेली असता साक्षीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर आईने आरडाओरडा केल्यावर घरातील व शेजारी धावून आले. त्यांनी साक्षीला खाली उतरवत जवळच्या दवाखान्यात नेले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान या घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Exit mobile version